संरक्षण मंत्रालय
डीआरडीओने घेतल्या स्ट्रॅटोस्फिअरिक एअरशिप हवाई तळाच्या प्राथमिक उड्डाण चाचण्या
Posted On:
03 MAY 2025 10:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2025
संरक्षण मंत्रालयाच्या डीआरडीओ म्हणजेच संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) मध्य प्रदेशातील श्योपूर चाचणी स्थळावरून 3 मे 2025 रोजी स्ट्रॅटोस्फिअरिक अर्थात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून काही मैल अंतरावरील बाहय आवरणात एअरशिप हवाई तळाच्या प्राथमिक उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या घेतल्या. आग्रा येथील हवाई संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेली ही एअरशिप सुमारे 17 किमी उंचीवर एक साधनसामग्री वाहक घेऊन प्रक्षेपित करण्यात आली.

या साधनसामग्री बरोबर असणाऱ्या संवेदकांकडून डेटा प्राप्त झाला असून त्याचा वापर भविष्यातील अतिशय उंची गाठणाऱ्या प्रस्तावित एअरशिप उड्डाणांसाठी उच्चकोटीची गुणवत्ता असलेल्या फिडेलिटी सिम्युलेशन मॉडेल्सच्या विकासासाठी केला जाईल. त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या उड्डाणात आवरण दाब नियंत्रक आणि आपत्कालीन दाब शिथिल प्रणाली तैनात करण्यात आल्या होत्या. चाचणी पथकाने या पुढील तपासण्यांसाठी प्रणाली पूर्वपदावर आणली. या उड्डाणाचा एकूण कालावधी सुमारे 62 मिनिटे एवढा राहिला.

या प्रणालीच्या यशस्वी प्राथमिक उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. ही प्रणाली भारताची पृथ्वी निरीक्षण आणि सर्वेक्षण, देखरेख तसेच गुप्तचर क्षमता अनोख्या पद्धतीने विकसित करेल, ज्यामुळे देश अशा प्रकारची स्वदेशी क्षमता असलेल्या जगातील काही मोजक्या देशांपैकी एक बनेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
* * *
S.Bedekar/S.Naik/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2126691)
Visitor Counter : 34