आयुष मंत्रालय
नाम परिषदेच्या पहिल्या दिवशी राज्य व केंद्रशासित प्रदेश आरोग्य मंत्र्यांचा सक्रिय सहभाग, आयुष सहयोगाला बळकटी देण्याचा मार्ग मोकळा
आमचे ध्येय 'आजारापासून निरोगीपणाकडे जाऊन आनंदाच्या दिशेने वाटचाल करणे' हे आहे: प्रतापराव जाधव
Posted On:
01 MAY 2025 10:16PM by PIB Mumbai
आयुष क्षेत्रात विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकून, तसेच त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करत, राष्ट्रीय आयुष मिशन (NAM) परिषद 2025 आज कैवल्यधाम, लोणावळा येथे सुरू झाली. देशभरात आयुष सेवांचा विस्तार करण्यासाठी तसेच त्यांना एकत्रित आणण्यासाठी भविष्यातील आराखडा आखण्यासाठी या कार्यक्रमाने भक्कम पाया तयार केला आहे. आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुष/आरोग्य मंत्री, विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेश सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दोन दिवसांच्या परिषदेचे उद्घाटन केले.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या या परिषदेत आयुष तज्ज्ञ, धोरणकर्ते, आरोग्य व्यावसायिक, संशोधक व नवोदितांना एकत्र आणले आहे. पारंपरिक भारतीय औषध प्रणालीचा समावेश मुख्य प्रवाहातील आरोग्यसेवेत करून आरोग्यसेवा क्षेत्राला बळ देणे, ज्यायोगे सामान्य नागरिकांसाठी अधिक सुलभ, परवडणारी व पुराव्यावर आधारित आरोग्य सुविधा देणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. या परिषदेचा कल निश्चित करताना केंद्रीय आयुष राज्यमंत्री म्हणाले, “मंत्रालयाने 2023 मध्ये नाम परिषदेचे आयोजन केले होते, जिथे विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मौल्यवान दृष्टिकोन सामायिक केला होता.

त्या संवादामुळे राष्ट्रीय आयुष मोहिमेची अंमलबजावणी व परिणाम यासाठी सुधारित कृती आराखडा तयार करण्यात आला. या यशाने प्रोत्साहन मिळाल्याचे नमूद करत, केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “मला विश्वास आहे, की राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेची ही दुसरी आवृत्ती राज्ये/केंद्रशासित प्रदेश व केंद्र सरकार दोघांकरिता संयुक्तपणे मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, प्रशासन व्यवस्था मजबूत करण्यासाठी, नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी, आर्थिक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी व तळागाळापर्यंत कार्यक्रमांची जलद तसेच प्रभावी अंमलबजावणी खात्रीशीर करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ म्हणून काम करेल."


* * *
S.Nilkanth/Parnika/Nikhilesh/D.Rane
(Release ID: 2125976)
अभ्यागत कक्ष : 61