रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
मेघालयमधील मावलिंखुंग (शिलाँगजवळ) ते आसाममधील पंचग्राम (सिल्चरजवळ) यांना जोडणाऱ्या 166.80 किमीच्या(NH-6) ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गिकेच्या हायब्रिड ऍन्युइटी मोड(HAM) स्वरुपातील बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
या मार्गिकेसाठी एकूण 22,864 कोटी रुपये भांडवली खर्च अपेक्षित
Posted On:
30 APR 2025 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने मेघालयमधील मावलिंखुंग (शिलाँगजवळ) ते आसाममधील पंचग्राम (सिल्चरजवळ) पर्यंतच्या 166.80 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 च्या भागाला चौपदरी ग्रीनफिल्ड नियंत्रित प्रवेश म्हणून हायब्रिड ॲन्युइटी मोडवर विकास, देखभाल आणि व्यवस्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही वापरावर नियंत्रण असलेली ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गिका असून तिच्या विकासाचा एकूण भांडवली खर्च 22,864 कोटी रुपये आहे. या प्रकल्पाचा 166.80 कि.मी. लांबी चा भाग मेघालय (144.80 कि.मी.) आणि आसाम (22.00 कि.मी.) राज्यांमध्ये आहे.
या प्रस्तावित ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गिकेमुळे गुवाहाटी ते सिल्चर दरम्यानच्या वाहतुकीच्या सेवेच्या स्तरामध्ये सुधारणा होईल. या मार्गिकेच्या विकासामुळे प्रवासाचे अंतर आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट झाल्यामुळे त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर आणि आसामच्या बराक खोऱ्यातील भागाच्या मुख्य भूमी आणि गुवाहाटीसोबतच्या संपर्कव्यवस्थेत सुधारणा होईल. यामुळे देशाच्या लॉजिस्टिक्स कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल.
ही मार्गिका आसाम आणि मेघालय यांच्यातील संपर्कव्यवस्था सुधारेल आणि मेघालयातील सिमेंट आणि कोळसा उत्पादन क्षेत्रांतून जात असल्याने तेथील उद्योगांच्या विकासासह आर्थिक विकासाला चालना देईल. गुवाहाटी विमानतळ, शिलाँग विमानतळ, सिल्चर विमानतळ (विद्यमान राष्ट्रीय महामार्ग क्र.-6 मार्गे) यांच्याद्वारे गुवाहाटी ते सिल्चरला जोडलेल्या या मार्गिकेमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची चांगली सोय होईल. यामुळे ईशान्य भारतातील पर्यटकांना आकर्षित करणारी विलोभनीय पर्यटन स्थळे जोडली जातील आणि पर्यटनाला चालना मिळेल.
या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे गुवाहाटी, शिलाँग आणि सिल्चर या शहरां दरम्यान, री भोई, पूर्व खासी टेकड्या, पश्चिम जैन्तिया टेकड्या, मेघालयातील पूर्व जैन्तिया टेकड्या आणि आसाममधील कछार जिल्हा मार्गे होणारी कनेक्टिव्हिटी (दळणवळण) सुधारेल, सध्याच्या एनएच-06 मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होईल आणि पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या अनुषंगाने वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा विकास होईल.
या प्रकल्पाचे संरेखन एनएच- 27, एनएच-106, एनएच-206, एनएच-37 यासह प्रमुख वाहतूक कॉरिडॉरशी जोडले गेले असून, गुवाहाटी, शिलाँग, सिल्चर, दिएंगपासोह, उम्मुलोंग, फ्रामेर, खलीरियात, राताचेरा, उमकियांग, कलाईन या भागाला अखंड कनेक्टिव्हिटी देईल.
शिलाँग – सिल्चर कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर तो गुवाहाटी, शिलाँग, सिल्चर, इंफाळ, ऐझवाल आणि आगरतळा यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारून या प्रदेशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावेल. हा प्रकल्प सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, जो मेघालय, आसाम, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये रोजगार निर्मिती करून पायाभूत सुविधांचा विकास करेल आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल.
वैशिष्ट्य
|
तपशील
|
प्रकल्पाचे नाव
|
राष्ट्रीय महामार्ग क्र.06 च्या मेघालयातील मावलिंगखुंग (शिलाँगजवळ) ते आसाममधील पंचग्राम (सिलचरजवळ) दरम्यान166.80 किमी चा हायब्रीड अॅन्युइटी मोडवर विकास, देखभाल व व्यवस्थापन |
कॉरिडॉर |
शिलाँग- सिल्चर (एनएच-06) |
लांबी (किमी)
|
166.8 कि.मी |
बांधकामाचा एकूण खर्च
|
12,087 कोटी रुपये |
भूसंपादन खर्च
|
3,503 कोटी रुपये |
एकूण भांडवली खर्च
|
22,864 कोटी रुपये |
प्रकार
|
हायब्रीड अॅन्युइटी मोड (एचएएम) |
जोडलेले प्रमुख रस्ते
|
एनएच -27, एनएच -106, एनएच -206, एनएच -37, एसएच -07, एसएच -08, एसएच -09, एसएच -38 |
जोडलेले आर्थिक / सामाजिक / वाहतूक विभाग
|
विमानतळ : गुवाहाटी विमानतळ, शिलाँग विमानतळ, सिल्चर विमानतळ |
जोडलेली प्रमुख शहरे / गावे
|
गुवाहाटी, शिलाँग, सिल्चर, डायंगपासोह, उम्मुलोंग, फ्रामेर, ख्लीरियाट, रताचेरा, उमकियांग, कलैन |
रोजगार निर्मितीची क्षमता
|
74 लाख मानव दिवस (प्रत्यक्ष) आणि 93 लाख मानव दिवस (अप्रत्यक्ष) |
आर्थिक वर्ष 2025 मध्ये वार्षिक सरासरी दैनंदिन रहदारी (एएडीटी)
|
अंदाजे 19,000-20,000 पॅसेंजर कार युनिट्स (पीसीयू) |

* * *
N.Chitale/Shailesh/Rajshree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125528)
Visitor Counter : 10