मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
जागतिक पशुवैद्यकीय दिन 2025: नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यशाळेत भारतातील पशुधन शक्तीमागील पशुवैद्यकांचा गौरव
“पशुवैद्य हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत”: प्रा. एस.पी. सिंह बघेल यांनी पशुधन क्षेत्रात मजबूत पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा आणि कौशल्यांचे केले आवाहन
Posted On:
26 APR 2025 6:40PM by PIB Mumbai
भारताच्या पशुधन अर्थव्यवस्थेतील मूक रक्षकांना मानवंदना देत मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करून जागतिक पशुवैद्यकीय दिन 2025 साजरा केला.


केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज राज्यमंत्री प्रा . एस. पी. सिंह बघेल यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी पशुवैद्यकीय समुदाय हा "ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय जैवसुरक्षेचा कणा" आहे असे ते म्हणाले. भारतात 536 दशलक्षहून अधिक पशुधन असून जगातील सर्वाधिक संख्या आहे . ग्रामीण भागातील सुमारे 70% कुटुंबे उत्पन्न, अन्न आणि सुरक्षिततेसाठी प्राण्यांवर अवलंबून आहेत. तरीही, प्राणी निरोगी रहावे याची काळजी घेणारे लोक क्वचितच प्रसिद्धीझोतात येतात असे ते म्हणाले. "निरोगी प्राण्यांशिवाय निरोगी भारत अशक्य आहे," असे सांगत पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, कौशल्य विकास आणि भविष्यासाठी सुरक्षित भारताच्या पशु आरोग्य प्रणालींवर भर देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात भर दिला.
या वर्षीची संकल्पना "प्राण्यांच्या आरोग्यासाठी चमूची गरज " अधोरेखित करत त्यांनी एकात्मिक प्राणी, मानवी आणि पर्यावरणीय आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी पशुवैद्यकीय, निम -पशुवैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य व्यावसायिकांमधील सहयोगी प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. बघेल यांनी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम (NADCP) सारख्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत प्रमुख उपक्रमांचा उल्लेख केला , ज्याचा उद्देश 2030 पर्यंत लाळ्या खुरकत रोगाचे (एफएमडी) निर्मूलन करणे आहे. आतापर्यंत देशात 114.56 कोटींहून अधिक एफएमडी लसीकरण आणि 4.57 कोटी ब्रुसेलोसिस लसीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट 2025 पर्यंत एफएमडी नियंत्रित करणे आणि 2030 पर्यंत लसीकरणाद्वारे निर्मूलन करणे आहे.
प्रा. एस.पी. सिंग बघेल यांनी देशाच्या पशुसंवर्धन क्षेत्राला बळकटी देण्यात देशी पशुधन प्रजातींच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी नमूद केले की या प्रजाती केवळ स्थानिक हवामान परिस्थितीशी जुळवून घेत नाहीत तर शाश्वत आणि लवचिक पशुधन प्रजनन प्रणाली सुनिश्चित करण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

राष्ट्रीय कार्यशाळेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी भारतातील पशुवैद्यकीय परिसंस्थेचा व्यापक आढावा घेण्याचे आवाहन केले. जागतिक पशुवैद्यकीय दिन 2025 कार्यक्रमात बोलताना, त्यांनी अधोरेखित केले की पशुधन उत्पादकता वाढविण्यात पशुवैद्यकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर सर्वात मोठा दूध उत्पादक देश , अंडी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा आणि मांस उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे .
या कार्यक्रमाला आयसीएआर, राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद, एफएओ, डब्ल्यूओएएच, डब्ल्यूएचओ आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांचे संचालक आणि अनेक पशुवैद्यकीय विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासह मान्यवर आणि हितधारक उपस्थित होते.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2124651)
Visitor Counter : 63