विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या वतीने (ANRF) पेअर (Partnerships for Accelerated Innovation and Research - PAIR) या आपल्या मुख्य कार्यक्रमाअंतर्गत 18 मुख्य संस्था आणि 106 सहभागी संस्थांची निवड केल्याची घोषणा
प्रविष्टि तिथि:
18 APR 2025 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2025
या कार्यक्रमासाठी 18 मुख्य संस्था (Hub institutions) आणि 106 सहभागी संस्था (Spokes) निवडण्यात आल्या आहेत. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनने (ANRF), गतीशील नवोन्मेष आणि संशोधनासाठी भागिदारी (Partnerships for Accelerated Innovation and Research - PAIR) अर्थात पेअर या आपल्या एका प्रमुख कार्यक्रमाअंतर्गत पेअर नेटवर्कच्या निवडीची घोषणा केली आहे. यात 18 मुख्य संस्था आणि 106 सहभागी संस्थांचा अंतर्भाव असल्याचे संस्थेने कळवले आहे.
या पेअर नेटवर्कच्या माध्यमातून विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आघाडीच्या संशोधन संस्थांसोबत सुनियोजित रचनात्मक मार्गदर्शन व्यवस्था आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. भारताच्या उच्च शिक्षण आणि संशोधन विषयक परिसंस्थेला सक्षम करणे, नवोन्मेषाला चालना देणे, संशोधन क्षमता घडवणे आणि विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केल्या गेलेल्या आवाहनाला शैक्षणिक क्षेत्राकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य संस्था म्हणून निवड होण्यासाठी आघाडीच्या 30 शैक्षणिक संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते, तर सहभागी संस्थाकरता 166 संस्थानी प्रस्ताव पाठवले होते. या सर्व प्रस्तावांचे कठोर मूल्यमापन केल्यानंतर 18 संस्थांची मुख्य संस्था म्हणून निवड करण्यात आली, तर देशभरातील 106 संस्थांचा सहभागी संस्था म्हणून अंतर्भाव केला गेला. आता या मुख्य संस्था आपल्या नेतृत्वात सहभागी संस्थांसोबत संयुक्त संशोधन आणि क्षमतानिर्मिती उपक्रम हाती घेणार आहेत.
अधिक सखोल संशोधनविषयक भागीदारी आणि समावेशक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने निवड झालेल्या संस्थांची दोन धोरणात्मक श्रेणींमध्ये विभागणी केली गेली आहे. :
- श्रेणी A: 7 मुख्य संस्था आणि 45 सहभागी संस्था
- श्रेणी B: 11 मुख्य संस्था आणि 61 सहभागी संस्था
निवड झालेल्या संस्थांची संपूर्ण यादी परिशिष्ट-I मध्ये दिली आहे (जोडलेली आहे).
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
* * *
S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2122769)
आगंतुक पटल : 61