सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय एन एस ओ नागपूर द्वारे. सामाजिक आर्थिक सर्वेक्षण-80 वीं फेरीवर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे 15 एप्रिल रोजी आयोजन

प्रविष्टि तिथि: 14 APR 2025 7:20PM by PIB Mumbai

नागपूर14 एप्रिल 2025

केंद्रीय  सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (क्षेत्रीय संकार्य विभाग)क्षेत्रीय कार्यालय नागपूर, एन.एस.एस. सामाजार्थिक सर्वेक्षण – 80वीं फेरी (एन.एस.एस. सामाजार्थिक-80वीं फेरी) वरील एक दिवसीय क्षेत्रीय प्रशिक्षण शिबिर दिनांक 15एप्रिल मंगळवार रोजी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (क्षेत्र संकार्य विभाग), क्षेत्रीय कार्यालय, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, ए ब्लॉक, तिसरा मजला, सेमिनरी हिल्स, नागपूर येथील कॉन्फरन्स रूममध्ये आयोजित केली जात आहे .

या प्रशिक्षण शिबिराचे आयोजक श्री रंगा श्रीनिवासुलु, संचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (क्षेत्रीय संकार्य  विभाग), क्षेत्रीय कार्यालय नागपूर हे आहेत. नागपूर येथील आंचलिक कार्यालयाचे उपमहासंचालक श्री श्रीनिवास उप्पला प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता  करतील.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) 1950 पासून राष्ट्राच्या सेवेत आहे, एन.एस.एस. द्वारे करण्यात येणार्या देशव्यापी नमुना सर्वेक्षणांद्वारे विविध सामाजार्थिक निर्देशकांवर एक मजबूत डेटाबेस तयार केला आहे. या आकडेवारीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांना विकास उपक्रमांचे नियोजन करण्यात आणि धोरणे आकार देण्यात मदत झाली आहे. एन.एस.ओ. समाजाच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी धोरणांचे नियोजन, संशोधन, निर्मिती आणि अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण इनपुट प्रदान करून, या संस्थेने गोळा केलेली आकडेवारी राष्ट्राच्या विकासात मोठी भूमिका बजावते.

विविध सामाजिक-आर्थिक मुद्द्यांवर सर्वेक्षण केले जातात; जसे:

  • घरगुती वापराचा खर्च
  • रोजगार आणि बेरोजगारी
  • संघटित आणि असंघटित क्षेत्र
  • अपंगत्व आणि आजारपण
  • देशांतर्गत पर्यटन खर्च
  • कर्जे आणि गुंतवणूक आणि जमीन आणि पशुधन
  • पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि राहण्याची परिस्थिती
  • वेळेच्या वापराचे सर्वेक्षण

व्यापक मॉड्यूलर सर्वेक्षण - शिक्षण (CMS-E: एप्रिल ते जून, 2025) हे सध्या चालू असलेले N.S.S. सामाजार्थिक सर्वेक्षण – 80वीं फेरीच्या सर्वेक्षणाचा भाग म्हणून समाविष्ट केले जाईल. या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट शिक्षणाशी संबंधित निर्देशकांची माहिती गोळा करणे आहे; प्रामुख्याने शिक्षणावरील कुटुंबांच्या खर्चावर लक्ष केंद्रित करणे. या सर्वेक्षणात अंदमान आणि निकोबार बेटांमधील गावे (ज्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण आहे) वगळता संपूर्ण भारतीय संघराज्याचा समावेश असेल. एन.एस.ओ. चे कुशल आणि प्रशिक्षित अधिकारी/कर्मचारी ई-सिग्मा सॉफ्टवेअरने सुसज्ज असलेल्या उपकरणांचा (टॅब्लेट) वापरुन माहिती गोळा करतात. हे अधिकारी वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेल्या नमुने घेण्याच्या तंत्रांवर आधारित निवडक गावे आणि शहरी ब्लॉकना भेट देतात. सर्व कुटुंबांची यादी केली जाते आणि घरातील प्रमुख किंवा घरातील जबाबदार आणि जाणकार व्यक्तीची मुलाखत घेऊन सर्व कुटुंब सदस्यांची तपशीलवार माहिती गोळा करण्यासाठी विशिष्ट कुटुंबांची निवड केली जाते. सांख्यिकी अधिकारी/कर्मचाऱ्यांना डेटा संकलनासाठी प्रशिक्षित करण्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल.

एन.एस.ओ. या प्रशिक्षण शिबिरात क्षेत्रीय संकार्य विभागाचे सुमारे 80 क्षेत्र अधिकारी/कर्मचारी सहभागी होतील. घरगुती सर्वेक्षण युनिट NSO चे प्रतिनिधी देखील यात सहभागी होतील.

***

D.Wankhede/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2121634) आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English