सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात फेब्रुवारी 2025 मध्ये 2.9% वाढीची नोंद
Posted On:
11 APR 2025 4:00PM by PIB Mumbai
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी) त्वरित अंदाज दर महिन्याच्या 12 तारखेला (किंवा 12 तारखेला सुट्टी असल्यास आधीच्या कामकाजाच्या दिवशी) सहा आठवड्यांच्या अंतराने जाहीर केला जातो आणि स्त्रोत एजन्सी ज्या उत्पादक कारखाने/आस्थापनांकडून डेटा प्राप्त करतात , त्यांच्याकडून मिळालेल्या आकडेवारीसह संकलित केला जातो.आयआयपीच्या सुधारित धोरणानुसार या त्वरित अंदाजांमध्ये पुढील प्रसिद्धीदरम्यान सुधारणा केल्या जातात.
2. ठळक वैशिष्ट्ये
- फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी आयआयपी वाढीचा दर 2.9 टक्के आहे जो जानेवारी 2025 मध्ये 5.0 टक्के (त्वरित अंदाज) होता.
- फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी खाणकाम, उत्पादन आणि वीज या तीन क्षेत्रांचा विकास दर अनुक्रमे 1.6 टक्के , 2.9 टक्के आणि 3.6 टक्के आहे.
- आयआयपीचा त्वरित अंदाज फेब्रुवारी 2024 मधील 147.1 च्या तुलनेत 151.3 आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये खाणकाम, उत्पादन आणि वीज क्षेत्रांसाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक अनुक्रमे 141.9, 148.6 आणि 194.0 आहेत.
- उत्पादन क्षेत्रात, एनआयसी 2 अंकी स्तरावर 23 पैकी 14 उद्योग समूहांनी फेब्रुवारी 2025 मध्ये फेब्रुवारी 2024 च्या तुलनेत सकारात्मक वाढ नोंदवली आहे. फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी आघाडीचे तीन सकारात्मक योगदानकर्ते आहेत - “मूलभूत धातूंचे उत्पादन” (5.8%), “मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी -ट्रेलरचे उत्पादन” (8.9%) आणि “इतर बिगर-धातू खनिज उत्पादनांचे उत्पादन” (8.0%)
- वापराच्या आधारे वर्गीकरणानुसार, फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी प्राथमिक वस्तूंसाठी निर्देशांक 152.3, भांडवली वस्तूंसाठी 115.5 , मध्यवर्ती वस्तूंसाठी 159.9 आणि पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तूंसाठी 191.3 आहेत. तसेच ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू आणि ग्राहकोपयोगी बिगर -टिकाऊ वस्तूंसाठी निर्देशांक अनुक्रमे 126.5 आणि 146.7 आहेत.
- गेल्या 13 महिन्यांसाठी आयआयपी मासिक निर्देशांक आणि विकास दर (% मध्ये)

3. फेब्रुवारी 2025 महिन्याच्या आयआयपीच्या त्वरित अंदाजांसह, जानेवारी 2025 च्या निर्देशांकांमध्ये पहिली सुधारणा करण्यात आली आहे आणि नोव्हेंबर 2024 च्या निर्देशांकांमध्ये स्त्रोत एजन्सींकडून प्राप्त झालेल्या अद्यतनित डेटा पडताळल्यानंतर अंतिम सुधारणा करण्यात आली आहे.
4. फेब्रुवारी 2025 महिन्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या त्वरित अंदाजांचे विवरण क्षेत्रीय,राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण (NIC-2008) चा 2--अंकी स्तर आणि वापर-आधारित वर्गीकरणानुसार अनुक्रमे विवरण I, II आणि III मध्ये दिले आहेत. तसेच, वापरकर्त्यांना औद्योगिक क्षेत्रातील बदलांचे आकलन करण्यासाठी, विवरण IV उद्योग गटांद्वारे (NIC-2008चा 2-अंकी स्तर) आणि क्षेत्रांद्वारे गेल्या 13 महिन्यांसाठी महिना-निहाय निर्देशांक प्रदान करते.
5. मार्च 2025 साठी निर्देशांक सोमवार, 28 एप्रिल 2025 रोजी जारी केला जाईल.
टीप : -
1. हे प्रसिद्धीपत्रक (इंग्रजी आणि हिंदी आवृत्ती) मंत्रालयाच्या वेबसाइटवर http://www.mospi.gov.in. देखील उपलब्ध आहे.
2. आयआयपीशी संबंधित तपशीलवार माहिती https://mospi.gov.in/iip आणि https://esankhyiki.mospi.gov.in/ वर उपलब्ध आहे.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121037)