संरक्षण मंत्रालय
सागर या हिंद महासागरीय जहाज मोहीमेअंतर्गत आयएनएस सुनयना हे जहाज रवाना होणार
Posted On:
05 APR 2025 10:20AM by PIB Mumbai
भारतीय नौदलाची अपतटीय गस्ती नौका (Indian Navy Offshore Patrol Vessel - NOPV) आयएनएस सुनयना कारवारहून हिंद महासागरीय मोहीमेअंतर्गत (Indian Ocean Ship - IOS) सागर (Security & Growth for All in the Region) प्रस्थान करणार आहे. या जहाजातून नऊ मित्र देशांचे (Friendly Foreign Nations - FFNs) 44 नौदल अधिकारी आणि कर्मचारी देखील प्रवास करतील.
आज, 05 एप्रिल 25 रोजी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झेंडा दाखवून करवार इथून या जहाजाला रवाना केले जाईल.
ही मोहीम सागरी प्रदेशाची प्रादेशिक स्तरावरील सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याअंतर्गत भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
सागर ही हिंद महासागरीय जहाज मोहीम म्हणजे, हिंद महासागराच्या नैऋत्येकडील क्षेत्रातील विविध नौदले आणि सागरी यंत्रणांना, भारताच्या भारतीय नौदलाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याच्या उद्देशाने राबवला जात असलेला पथदर्शी प्रकल्प आहे. या मोहीमेच्या माध्यमातून मित्र देशांतील सागरी प्रवासाच्या प्रशिक्षणार्थींना (sea-riders) मित्र देशांकडून सर्वंकष प्रशिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माध्यमातून सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी एका अभूतपूर्व सहकार्याचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
आपल्या या मोहिमेदरम्यान आयएनएस सुनयना दार-एस-सलाम, नाकाला, पोर्ट लुईस आणि पोर्ट व्हिक्टोरिया या ठिकाणांना भेट देणार आहे. या जहाजावरील आंतरराष्ट्रीय कर्मचारीवर्ग सागरी प्रशिक्षण सराव उपक्रमात सहभागी होतील. या उपक्रमाअंतर्गत ते कोची इथल्या प्रशिक्षण केंद्रात घेतलेल्या विविध व्यावसायिक प्रशिक्षणांद्वारे प्राप्त केलेल्या व्यावसायिक ज्ञानाचे प्रात्यक्षिक करून दाखवतील. या नियोजित सराव आणि प्रशिक्षणाअंतर्गत अग्निशमन, नुकसान नियंत्रणात ठेवणे, संशयास्पद जहाजांची तपासणी आणि जप्ती (Visit Board Search and Seizure - VBSS), सेतू मोहिमा (bridge operations), नौकाचालन (seamanship), इंजिन दालन व्यवस्थापन, स्विचबोर्ड मोहिमा आणि नौका हाताळणी (boat handling) अशा कार्यवाहींचा समावेश असणार आहे. यामुळे भारतीय नौदल तसेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांमधील समन्वयात्मक कार्यान्वयनात अधिक सुधारणा होण्यात मदत मिळणार आहे.
सागर ही हिंद महासागरीय जहाज मोहीम हिंद महासागर क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आपल्या सागरी क्षेत्रातील शेजारी देशांसोबत दृढ संबंध प्रस्थापित करण्यासाठीची तसेच हिंद महासागर क्षेत्रात अधिक सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सशक्त सागरी परीक्षेत्रीय वातावरण निर्माण करण्यासाठीच्या वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
या मोहिमेला झेंडा दाखवून रवाना करण्याच्या समारंभाचे थेट प्रक्षेपण भारतीय नौदलाच्या युट्युब वाहिनीवर केले जाणार आहे.
(4)BDE7.jpeg)
(2)LRPL.jpeg)
(4)1ZMQ.jpeg)
***
S.Pophale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119214)
Visitor Counter : 45