ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) मुंबई शाखा कार्यालय-II मार्फत नव्याने परवाना मिळवणाऱ्यांसाठी “मानक संवाद” प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 04 APR 2025 6:01PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय मानक ब्युरो (बीआयएस), मुंबई शाखा कार्यालय-II द्वारे, "मानक संवाद" या नवीन परवानाधारकांसाठी परस्परसंवादी प्रशिक्षण  सत्राचे   04 एप्रिल 2025 रोजी मुंबईतल्या पवई येथील पश्चिम प्रादेशिक कार्यालयात आयोजन  करण्यात आले होते.

नवीन परवानाधारक भागधारकांना बीआयएस परवान्यांच्या कार्यपद्धतींचे सखोल ज्ञान देऊन त्यांचा पाया मजबूत करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला. बीआयएस प्रमाणन प्रक्रियेतील बारकावे समजून घेण्यासाठी, गुणवत्ता हमी, मानक अनुपालन आणि ग्राहकांच्या विश्वासासाठी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भागधारकांना साहाय्य  करण्यासाठी हा कार्यक्रम काळजीपूर्वक आखण्यात आला.

या प्रशिक्षणात बीआयएस  परवाना धारकांच्या कार्यक्षमतेसाठी अत्यावश्यक असलेल्या विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला.  सहभागींना  "मानक" ऑनलाईन पोर्टलबाबत सविस्तर माहिती देण्यात आली व प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामुळे ते त्यांच्या परवाना संबंधीचे  कामकाज डिजिटल पद्धतीने सोप्या आणि कार्यक्षम पद्धतीने हाताळू शकतील. यासोबतच बीआयएस मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची ओळख करून देण्यात आली, ज्यामुळे उत्पादन चाचणी व नमुना पाठविण्याच्या प्रक्रियेबद्दल त्यांना स्पष्टता मिळाली.

या सत्रात ग्रँट ऑफ लायसन्स (जीओएल) आणि सर्व्हेलन्स सॅम्पलिंग (एसयूएस) मार्गदर्शक तत्त्वांची सविस्तर माहिती देण्यात आली जेणेकरून त्यांना  प्रमाणपत्रोत्तर आवश्यकता आणि अनुपालन यंत्रणेबाबत ज्ञात होण्याची सुनिश्चिती होईल. , सहभागी लोकांना गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे (क्युओसीओएस) अर्थ व अंमलबजावणी याविषयी स्पष्टता देण्यात आली, जे सक्तीच्या प्रमाणन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या वास्तुनिर्मात्यांसाठी  व आयातदारांसाठी महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, “Know Your Standards”  आणि “बीआयएस केअर अ‍ॅप" सारख्या बीआयएसच्या जनजागृती उपक्रमांचीही माहिती देण्यात आली.

सहभागीला 4 जीबी क्षमतेची पेन ड्राइव्ह देण्यात आली, ज्यामध्ये सर्व प्रशिक्षण साहित्य, सादरीकरणे व वापर पुस्तिकांचा समावेश होता. यामुळे सहभागी भविष्यातही संदर्भासाठी ही माहिती वापरू शकतील.

या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील 21 नव्याने समाविष्ट झालेले  परवानाधारक  सहभागी उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणातील स्पष्टता, सुसंगतता व वापरण्यास सुलभ स्वरूपाबद्दल समाधान व्यक्त केले आणि बीआयएस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार मानले.

हा प्रशिक्षण उपक्रम बीआयएसच्या गुणवत्तेची, पारदर्शकतेची आणि नियामक अनुपालनाची संस्कृती जोपासण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. मुंबई शाखा कार्यालय-II सातत्याने अशा क्षमतावर्धन उपक्रमांच्या माध्यमातून परवाना धारकांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे, जेणेकरून प्रत्येक परवानाधारक त्यांच्या संबंधित क्षेत्रात उच्चतम मानकांचे पालन करू शकेल.

***

S.Kakade/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119071) Visitor Counter : 25
Read this release in: English