कोळसा मंत्रालय
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक खाणींमधून विक्रमी उत्पादन आणि पुरवठ्याचा कोळसा मंत्रालयाचा अहवाल
Posted On:
02 APR 2025 2:25PM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाने 2024-25 या आर्थिक वर्षात कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक खाणींमधून कोळसा उत्पादन आणि पुरवठ्यात नवीन विक्रम प्रस्थापित करत एक ऐतिहासिक यश मिळवले आहे. मागील वर्षीच्या 147.11 मेट्रिक टनपेक्षा 29.79% लक्षणीय वाढ नोंदवत 31 मार्च 2025 पर्यंत एकूण कोळसा उत्पादन 190.95 दशलक्ष टन (एमटी) पर्यंत वाढले आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नोंदवलेल्या 142.79 मेट्रिक टनपेक्षा 33.36% वाढ नोंदवत कोळशाच्या पुरवठ्यातही 190.42 मेट्रिक टनपर्यंत अभूतपूर्व वृद्धी झाली. ही उल्लेखनीय आकडेवारी या क्षेत्राची लवचिकता, कार्यक्षमता आणि भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करताना वीज, पोलाद आणि सिमेंटसारख्या उद्योगांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका दर्शवते.
या यशात कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक दोन्ही खाणींचे महत्त्वपूर्ण योगदान आहे:
कॅप्टिव्ह खाणींनी मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात 24.72% आणि पुरवठ्यात 27.76% वाढ साध्य केली, ज्यामुळे मुख्य उद्योगांना स्थिर पुरवठा सुनिश्चित झाला.
व्यावसायिक खाणींनी ही गती राखत, उत्पादनात 67.32% वाढ नोंदवली आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरवठ्यात 76.71% वृद्धी नोंदवली जी भारताच्या कोळसा क्षेत्राच्या विस्ताराची आणि कार्यक्षमतेची द्योतक आहे.
हे विक्रमी यश भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या धोरणात्मक प्रयत्नांचे मूर्त स्वरूप असून याद्वारे जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून देशाचे स्थान मजबूत होते. कोळसा मंत्रालय एक शाश्वत, कार्यक्षम आणि भावी सुसज्ज कोळसा परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या बांधिलकीवर दृढ असून हे केवळ देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या मागण्या पूर्ण करत नाही तर भारताच्या हरित विकास उद्दिष्टांशी देखील सुसंगत आहे.
हा टप्पा सरकारच्या विकसित भारत 2047 च्या दृष्टिकोनाला साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे एक लवचिक, ऊर्जा-सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध भारत सुनिश्चित होईल. नवोन्मेष, कार्यक्षमता आणि शाश्वततेवर जोरदार लक्ष केंद्रित करून, कोळसा क्षेत्र औद्योगिक वाढीला चालना देत आहे, आर्थिक प्रगती उंचावत आहे आणि भावी पिढ्यांसाठी हरित भविष्य घडवत आहे.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2117849)
Visitor Counter : 23