वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला-नेतृत्वाखालील उद्योग आणि लघु उद्योगांची समावेशकता वाढवण्यासाठी सरकारने GeM मंचाचा केला विस्तार

Posted On: 21 MAR 2025 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मार्च 2025

 

सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) हे लघु आणि महिलांच्या नेतृत्वातिल उद्योगांसाठी एक समावेशक आणि सुलभ व्यासपीठ बनावे यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. यापैकी काही उपाययोजना खालील प्रमाणे आहेत:

महिला उद्योजकांनी थेट खरेदी/ खरेदीच्या L1 पद्धतीमध्ये केलेल्या उत्पादनांच्या कॅटलॉगमध्ये स्पष्ट फरक दर्शविण्यासाठी मार्केटप्लेस फिल्टर्स आणि उत्पादन कॅटलॉग आयकॉनची तरतूद.

8 "व्होकल फॉर लोकल" ई बाजारपेठ आउटलेट स्टोअर्सच्या माध्यमातून महिला, स्टार्टअप्स, बचत गट, कारागीर आणि विणकर, एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी), शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) इत्यादींसाठी फॉरवर्ड मार्केट लिंकेज.

ई बाजारपेठ मंचावर  2-टप्पा आधारित विक्रेत्यांच्या स्वयं-नोंदणीसाठी उद्यम एमएसएमई डेटाबेससह अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय)चे एकत्रीकरण.

उद्योग, सरकार आणि लघु उद्योग भारती, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री लेडीज ऑर्गनायझेशन स्वयंरोजगार महिला संघटना यासारख्या ना नफा  क्षेत्रातील इतर प्रमुख कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे धोरणात्मक संबंध प्रस्थपित करणे.

भारत व्यापार संवर्धन संस्था, इंडिया एक्सपोझिशन मार्ट लिमिटेड (IELM) येथे आयोजित उद्योग प्रदर्शने, मेळावे, रोड शो आणि कार्यक्रम इत्यादींमध्ये सहभाग.

चालू आर्थिक वर्षात लघु उद्योग भारती, अमेझॉन सहेली, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, फिक्की, असोसिएशन ऑफ लेडी एंटरप्रेन्योर्स ऑफ इंडिया यासारख्या एमएसएमई  संघटनांसोबत 35 साप्ताहिक विक्रेता ऑनबोर्डिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.

GeM महिला उद्योजकांनी थेट खरेदी/ खरेदीच्या L1 पद्धतीमध्ये केलेल्या उत्पादनांच्या कॅटलॉगमध्ये स्पष्ट फरक दर्शविण्यासाठी मार्केटप्लेस फिल्टर आणि उत्पादन कॅटलॉग आयकॉन प्रदान करते, ज्यामुळे ते लगेच दिसून येते  आणि सुलभता प्रदान होते. यामुळे सरकारी खरेदीदारांकडून सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी (MSEs) सार्वजनिक खरेदी धोरण, 2012 (वेळोवेळी सुधारित) चे पालन करणे सहज शक्य होते.

ही माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

 

* * *

N.Chitale/H.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2113835) Visitor Counter : 30


Read this release in: English , Urdu , Hindi