पंतप्रधान कार्यालय
राज्यसभा खासदार सदस्य थिरू इलैयाराजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
Posted On:
18 MAR 2025 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2025
राज्यसभा खासदार थिरू इलैयाराजा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी इलैयाराजा यांच्या लंडनमध्ये प्रतिष्ठित रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्रासह अलीकडेच सादर केलेल्या पहिल्या पाश्चात्य शास्त्रीय सिम्फनी,‘व्हॅलिअंट’ची प्रशंसा केली. भारतीय आणि जागतिक संगीतावर त्यांचा अतुलनीय प्रभाव अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलैयाराजाचे "संगीतातील महान आणि एक अग्रणी" म्हणून कौतुक केले. इलैयाराजा यांचे कार्य जागतिक स्तरावर उत्कृष्टतेला नवी परिभाषा देत आहे ,असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे;
"राज्यसभा खासदार थिरु इलैयाराजा जी, संगीत क्षेत्रातील असे प्रतिभावंत आहेत ज्यांचा आपल्या संगीत आणि संस्कृतीवर अभूतपूर्व प्रभाव आहे, त्यांना भेटून आनंद झाला.
ते प्रत्येक अर्थाने एक अग्रणी आहेत आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये आपली पहिली पाश्चात्य शास्त्रीय सिम्फनी, व्हॅलिअंट सादर करून इतिहास घडवला. या सादरीकरणात त्यांच्या सोबतीला जगप्रसिद्ध रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्रा होता. ही महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांच्या अतुलनीय संगीत प्रवासातील आणखी एक अध्याय आहे - जो जागतिक स्तरावर उत्कृष्टतेची व्याख्या नव्याने लिहीत आहे.
@ilaiyaraaja”
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112439)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam