पोलाद मंत्रालय
भारतीय पोलाद क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी पोलाद आणि अवजड उद्योग राज्यमंत्री भूपतिराजू श्रीनिवास वर्मा यांनी एसआरटीएमआय’च्या संशोधन आणि विकास योजना तसेच एसआरटीएमआय’ वेब पोर्टलचा केला प्रारंभ
Posted On:
12 MAR 2025 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2025
पोलाद मंत्रालयाचे सहकार्य लाभलेल्या तसेच भारतीय पोलाद उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचा संयुक्त उपक्रम असलेल्या भारतीय पोलाद संशोधन तंत्रज्ञान अभियान (SRTMI) ने 12 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे "भारतीय पोलाद क्षेत्रातील संशोधन आणि विकास उत्प्रेरक" या कार्यक्रमात तीन नवीन संशोधन आणि विकास योजना आणि एका वेब पोर्टलचा प्रारंभ केला.
या कार्यक्रमात प्रमुख पोलाद कंपन्या (एसएआयएल, जेएसडब्ल्यू, जेएसपीएल, टाटा स्टील, एनएमडीसी, जेएसएल, आरआयएनएल, मेकॉन इ.), प्रमुख शैक्षणिक संस्था (आयआयटी कानपूर, आयआयटी मुंबई, आयआयटी खरगपूर, आयआयटी रुरकी, आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठ, एनआयटी त्रिची, आयआयटी हैदराबाद, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयएसएम धनबाद, इ.), संशोधन संस्था (सीएसआयआर - आयएमएमटी), स्टार्टअप्स तसेच स्वीडिश एनर्जी संस्था आणि आशियाई विकास बँक या सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहभाग नोंदवला.

पोलाद आणि अवजड उद्योग राज्यमंत्री भूपतिराजू श्रीनिवास वर्मा यांनी संशोधन आणि विकास योजना तसेच एसआरटीएमआय’ वेब पोर्टलचा प्रारंभ केला. पोलाद क्षेत्रातील नवोपक्रम आणि शाश्वतता वाढवण्यात या योजना आणि पोर्टलची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

वर्ष 2030 पर्यंत भारत 300 मेट्रिक टन स्टील क्षमतेकडे वाटचाल करत असताना नवीन संशोधन आणि विकास उपक्रम आणि पोलाद भागीदारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, यावर भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी भर दिला. त्यांनी तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणाला गती देण्याची तसेच भांडवली वस्तूंच्या उत्पादनाचे स्वदेशीकरण करण्याची गरज अधोरेखित केली. एसआरटीएमआय’ वेब पोर्टल सहभाग, कल्पनांचे आदानप्रदान आणि उद्योग-व्यापी सहकार्याला चालना देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

S.Kakade/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111037)
Visitor Counter : 29