माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेद्वारे पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात हॅन्ड-पेंटेड पोस्टर डिझायनिंगवर ‘वेव्ह्ज मास्टरक्लास’चे आयोजन
ख्यातनाम कलाकार सुबोध गुरुजी यांच्या हाताने रंगवलेल्या पोस्टर डिझाईनवरील मास्टरक्लासमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा कलात्मक वारसा साजरा
Posted On:
11 MAR 2025 8:50PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 11 मार्च 2025
दृश्यात्मक कलाप्रकार आणि भारतीय सिनेमाच्या सदैव स्मरणात राहिलेल्या चित्रपटांच्या पोस्टर्सचा उत्सव साजरा करण्यासाठी, पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने, वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट (वेव्ह्ज) 2025 - क्रिएट इन इंडिया चॅलेंज - सीझन 1 (सीआयसी) अंतर्गत हाताने रंगवलेल्या पोस्टर डिझायनिंगवर दोन दिवसीय मास्टरक्लास आयोजित केला होता. एफटीआयआयच्या सेंटर फॉर ओपन लर्निंगने (सीएफओएल) पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या सहयोगाने विद्यार्थ्यांना काळाचे बंधन नसलेल्या या कलेत गुंतवून ठेवण्यासाठी आणि वेव्ह्ज ले - फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंजबद्दल जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एफटीआयआय पुणे द्वारे 7 आणि 11 मार्च 2025 रोजी पोस्टर डिझाईन कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
भारतीय सिनेमाच्या पोस्टर् डिझाईन मधील एक आदरणीय व्यक्ती, ज्यांनी अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम केले आहे आणि राज कपूर यांच्या क्लासिक श्रेणीतील चित्रपटांसाठी योगदान दिले आहे, असे ख्यातनाम पोस्टर आर्टिस्ट सुबोध गुरुजी, यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले. हाताने रंगवलेल्या पोस्टर डिझाईनमधील त्यांचे कौशल्य कलाकारांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. एफटीआयआय मधील असोसिएट प्रोफेसर मिलिंद आणि प्रॉडक्शन डिझाइनचे विभाग प्रमुख आशुतोष कवीश्वर हे देखील या कार्यशाळेत सहभागी झाले.
मास्टरक्लासच्या पहिल्या दिवशी अभिनव कला महाविद्यालयातील सुमारे 30 विद्यार्थी सहभागी झाले, ज्यांना सुबोध गुरुजी यांनी हाताने रंगवलेल्या पोस्टर्सच्या विश्वाचा परिचय करून दिला. सत्राच्या सुरुवातील दामले यांनी राज कपूर यांच्या चित्रपटांची आणि त्यांच्या आयकॉनिक (लक्षवेधी) पोस्टर्सची अभ्यासपूर्ण ओळख करून दिली, त्यानंतर गुरुजी यांनी पोस्टर डिझाइन तंत्राचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. या संवादात्मक सत्रात विद्यार्थ्याना प्रश्न विचारता आले आणि या मास्टर आर्टिस्टच्या अफाट अनुभवांमधून शिकता आले .
मास्टर क्लासच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पोस्टर डिझाईनचे सादरीकरण केले, त्यानंतर त्यांच्या कामाबाबत चर्चा झाली. गुरुजी व त्यांच्या टीमने अभिप्राय देत विद्यार्थ्यांना त्यांच्या कलात्मक क्षमतेचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण करून सत्राची सांगता झाली.
मास्टरक्लासने विद्यार्थ्यांना लोप पावत चाललेल्या या कलेशी जोडून घेण्याची आणि हाताने रंगवलेल्या पोस्टर्सच्या माध्यमातून भारतीय सिनेमाचे सार सृजनात्मक रीतीने सादर करण्याची संधी दिली.
* * *
PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2110529)
| Visitor Counter:
46