विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताची भविष्यातील साथरोगांच्या परिस्थितीसाठीची पूर्वतयारी याविषयावरील चर्चेत केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचा सहभाग
नीती आयोगाने प्रकाशित केलेला 'फ्यूचर पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस अँड इमर्जन्सी रिस्पॉन्स : अ फ्रेमवर्क फॉर ॲक्शन' या शीर्षकाअंतर्गतचा अहवाल डॉ.जितेंद्र सिंह यांना सुपूर्द
Posted On:
10 MAR 2025 7:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मार्च 2025
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान मंत्री तसेच पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, लोकतक्रार आणि निवृत्ती वेतन विभाग यांचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भारताची भविष्यातील साथरोगांच्या परिस्थितीसाठीची पूर्वतयारी याविषयी एका कार्यक्रमात चर्चा केली.
यावेळी,नीती आयोगाचे सदस्य डॉ.विनोद पॉल यांनी नीती आयोगानं प्रकाशित केलेला फ्यूचर पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस अँड इमर्जन्सी रिस्पॉन्स : अ फ्रेमवर्क फॉर ॲक्शन या शीर्षकाअंतर्गतचा अहवाल डॉ.जितेंद्र सिंह यांना सुपूर्द केला.

नीती आयोगाने नेमलेल्या तज्ञ गटाने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात भविष्यातील साथरोगांसाठी तयारीच्या दृष्टीने केलेल्या शिफारशींचा समावेश आहे. याअंतर्गत विशेषतः रोग निदान, लसी आणि उपचार या वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाय योजना विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. या अहवालातून निती आयोगाने भविष्यातील कोणत्याही साथरोगाच्या प्रादुर्भावानंतर 100 दिवसांच्या आत वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यासाठीच्या कृतीशील मार्गांची रूपरेषा मांडली आहे. यासाठी उत्पादन क्षमता वाढवणे, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज तयार करणे, नियामक प्रणाली सक्षम करणे आणि क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याची गरजही या अहवालात अधोरेखीत केली आहे.
यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी संशोधन आणि विकासासाठीचे पथक कसे तयार करावे,संभाव्य रोगप्रतिबंधक आणि प्रोटोटाइप लसींच्या निर्मितीसाठी पायाभूत सुविधांसह उद्योग क्षेत्राच्या सोबतीनं, विभागीय पातळीवरील तसेच इतर भागधारकांसोबत एकत्रितपणे, धोरणात्मक , वैज्ञानिक आणि सक्रिय पद्धतीने काम करण्यासाठी कसे जोडून घ्यावे या मुद्यांवर मार्गदर्शन केले. भारताच्या आंतरक्षेत्रीय वन हेल्थ मिशन अंतर्गत यापूर्वीच संभाव्य प्रादुर्भावांच्या अनुषंगाने साथरोग देखरेख व्यवस्थेची पुनर्रचना केली आहे.


भारताच्या विस्तारीत व्याप्ती असलेल्या संशोधन आणि विकासविषयक क्षमता तसेच औद्योगिक परिसंस्थेचे भविष्यातील कोणत्याही साथरोगाच्या काळातील प्रतिसादाच्या दृष्टीने अधिक बळकटीकरण करण्याचा निर्धार देशाने केला असल्याची बाबही जितेंद्र सिंग यांनी यावेळी अधोरेखित केली.
S.Kane/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110003)
Visitor Counter : 19