लोकसभा सचिवालय
भगत सिंह कोश्यारी जी हे एक सामान्य जीवन जगणारे असामान्य व्यक्तिमत्व आहे : लोकसभा अध्यक्ष
Posted On:
09 MAR 2025 7:36PM by PIB Mumbai
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री; महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी राज्यपाल आणि माजी खासदार भगत सिंह कोश्यारी यांची प्रशंसा केली. कोश्यारी हे एक सामान्य जीवन जगणारे असामान्य व्यक्तिमत्व आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कोश्यारी यांचा जीवन संघर्ष तसेच राष्ट्र आणि समाजासाठीचे योगदान केवळ आताच्या पिढीसाठीच नाही तर भावी पिढ्यांसाठी देखील प्रेरणादायी आहे, असे बिर्ला यांनी सांगितले.
दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (आयजीएनसीए) येथे मदन मोहन सती यांनी "पर्वत शिरोमणी भगत सिंह कोश्यारी" या पुस्तकाचे प्रकाशन बिर्ला यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
कोश्यारी यांच्या गौरवशाली जीवनाबद्दल बोलताना बिर्ला म्हणाले की, एक विद्यार्थी, राजकारणी, लेखक आणि पत्रकार म्हणून कोश्यारी यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले. गरीब आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. त्यांनी अधोरेखित केले की, आपल्या संपूर्ण आयुष्यात कोश्यारी यांनी राष्ट्राला सर्वांपेक्षा वरचे स्थान देण्याचे तत्व कसोशीने पाळले. संसदेत कोश्यारींसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण करून देताना लोकसभा अध्यक्षांनी सुहृदतेने सांगितले की, संसद सदस्य आणि संसदीय समितीचे अध्यक्ष या नात्याने कोश्यारी यांनी सर्वोच्च वचनबद्धतेने संस्थेची सेवा करण्यासाठी अतुलनीय समर्पण दाखवले आहे.
मुख्यमंत्री किंवा राज्यपाल किंवा संसद सदस्य म्हणून काम करताना कोश्यारी यांनी अहंकार किंवा सत्तेची लालसा दाखवली नाही, हे लोकसभा अध्यक्षांनी अधोरेखित केले. ते पदावर असो वा नसो, तत्त्वे आणि नियमांचे पालन नेहमीच दृढतेने करत राहिले, हे बिर्ला यांनी लक्षात आणून दिले.
"पर्वत शिरोमणी भगतसिंग कोश्यारी" हे पुस्तक भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल, जीवनातील आव्हानांना अढळ संकल्पाने कसे तोंड द्यावे तसेच देश आणि नागरिकांच्या सेवेसाठी कसे वचनबद्ध राहावे यांचे मार्गदर्शन करेल असा विश्वास बिर्ला यांनी व्यक्त केला.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2109719)
Visitor Counter : 36