गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
सदस्य देशांनी जयपूर जाहीरनामा एकमताने स्वीकारत आशिया आणि पॅसिफिकमधील 12 व्या प्रादेशिक 3आर आणि चक्राकार अर्थव्यवस्था मंचाची सांगता
Posted On:
05 MAR 2025 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2025
आशिया आणि पॅसिफिकमधील 12 व्या प्रादेशिक 3आर आणि चक्राकार अर्थव्यवस्था मंचाचा सांगता आज सदस्य देशांनी 'जयपूर जाहीरनामा' एकमताने स्वीकारून झाली.
राष्ट्रीय धोरणे, परिस्थिती आणि क्षमतांनुसार देशांना सूचक धोरणे सुचवण्यासाठी एक मार्गदर्शक दस्तावेज तयार करण्यात आला आहे.
जयपूर जाहीरनाम्याचा एक भाग म्हणून, जागतिक आघाडी सी-3 (सिटीज कोलिशन फॉर सर्कुलॅरिटी) म्हणून एक सहयोगी ज्ञान मंचाला देखील मान्यता देण्यात आली.
जयपूर जाहीरनाम्यात विविध टाकाऊविषयक पद्धती आणि त्या प्रत्येकासाठी चक्राकार अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांबद्दल तसेच संसाधन कार्यक्षमता आणि शाश्वत सामग्री वापराबद्दल त्यात माहिती आहे. या जाहीरनाम्यात अनौपचारिक क्षेत्रे, स्त्री-पुरुष समस्या आणि कामगार समस्यांचा देखील समावेश आहे.
त्यात अंमलबजावणीची साधने, भागीदारी, तंत्रज्ञान हस्तांतरण, निधी यंत्रणा आणि संशोधन आणि विकासाची देखील तरतूद आहे.
केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की, आज स्वीकारण्यात आलेला जयपूर जाहीरनामा या सामायिक बांधिलकीचा पुरावा आहे. हा दशकीय जाहीरनामा 'जयपूर' या नावाशी जोडला जाईल याचा मला आनंद आहे आणि जरी तो बंधनकारक नसला तरी, तो आपल्या देशाला आणि आशिया पॅसिफिकच्या सर्व सदस्य राष्ट्रांना चक्राकार संक्रमणाकडे नेईल.
"एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" या आपल्या तत्त्वावर आधारित, सिटीज कोलिशन फॉर सर्कुलॅरिटी साठी शहरे युती (सी-3) स्थापनेत भारत पुढाकार घेईल असेही त्यांनी नमूद केले आणि सर्व संयुक्त राष्ट्र सदस्य देशांना या युतीत सामील होण्यासाठी आमंत्रित केले.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री तोखन साहू म्हणाले की आशिया आणि पॅसिफिकसाठी 12 वा प्रादेशिक 3 आर आणि चक्राकार अर्थव्यवस्था मंच हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
फलनिष्पत्तीसाठी येथे क्लिक करा
कार्यक्रमात सहभाग
आशिया आणि पॅसिफिकमधील 12 वा प्रादेशिक 3 आर आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था मंचात उच्चस्तरीय सहभाग दिसून आला, माननीय केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणाच्या मंत्र्यांसह या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
या मंचात 24 आशिया-पॅसिफिक सदस्य देशांचा प्रत्यक्ष सहभाग होता, ज्यात जपान, सोलोमन बेटे, तुवालू आणि मालदीवचे मंत्री प्रत्यक्ष उपस्थित होते. सरकारी अधिकारी, तज्ञ आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधींसह जवळजवळ 200 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी चर्चेत सहभागी झाले.
आशिया आणि पॅसिफिकमधील 12 व्या प्रादेशिक 3आर आणि चक्राकार अर्थव्यवस्था मंचाच्या दुसऱ्या दिवशी भारताने 2025 मध्ये ब्राझीलमधील साओ पाउलोनंतर जागतिक चक्राकार अर्थव्यवस्था मंच (डब्ल्यूसीईएफ) 2026 चे यजमानपद भूषवण्यासाठी आपली उमेदवारी जाहीर केली.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
(Release ID: 2108681)
Visitor Counter : 17