दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईसह नऊ शहरांमध्ये डिसेंबर 2024 मध्ये केलेल्या स्वतंत्र ड्राईव्ह टेस्टच्या अहवालाचे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केले प्रकाशन

Posted On: 05 MAR 2025 3:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 05 मार्च 2025

ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आपल्या नियुक्त संस्थेकडून नवी मुंबई शहरासह( मुंबई एलएसए) नऊ शहरांमध्ये, महामार्गांवर आणि रेल्वे मार्गांवर स्वतंत्र ड्राईव्ह टेस्ट (IDT) केल्या. सेल्युलर मोबाईल टेलिफोन सेवा पुरवठादारांकडून देण्यात येणाऱ्या व्हॉईस आणि डेटा सेवांची गुणवत्ता तपासण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2024 मध्ये या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये मे. भारतीय एयरटेल लि. मेसर्स बीएसएनएल/ एमटीएनएल, मेसर्क रिलायन्स जियो इन्फोकॉम लि. आणि मेसर्स व्होडाफोन आयडिया लिमिटेड  या कंपन्यांकडून  विविध तंत्रज्ञानाच्या( 2G/ 3G/ 4G/ 5G यांसारख्या) माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता तपासण्यात आली.

या ड्राइव्ह टेस्टच्या अहवालांमध्ये सादर केलेली निरीक्षणे ड्राइव्ह चाचणी आयोजित करण्याच्या दिवशी/वेळेस चाचणी अंतर्गत क्षेत्र/मार्गावरील सेवा पुरवठादारांच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

खाली दिलेल्या प्रदेशात सेवा पुरवणाऱ्या सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांच्या  व्हॉईस त्याचबरोबर डेटा सेवांचे खालील प्रमुख कामगिरी निर्देशांकांचे मूल्यमापन करण्यात आले.

I.व्हॉईस सेवा:

a. कॉल सेटअप सक्सेस रेट

b. ड्रॉप कॉल दर(DCR)

c.एमओएस वापरून स्पीच क्वालिटी (mean opinion score)

d.डाऊनलिंक आणि अपलिंक पॅकेट (voice) ड्रॉप रेट

e.कॉल सायलेन्स रेट

f.कव्हरेज (%)- सिग्नल स्ट्रेन्ग्थ

II.डेटा सर्विस:

a. डेटा थ्रूपुट (डाऊनलिंक आणि अपलिंक दोन्ही)

b. पॅकेट ड्रॉप रेट (डाऊनलिंक आणि अपलिंक)

c.व्हिडिओ स्ट्रिमिंग डिले

d.लेटन्सी

e.जिटर

2.नवी मुंबईत केलेल्या ड्राइव्ह टेस्टचा तपशील खाली दिलेला आहे.

शहराचे नाव

परवाना सेवा क्षेत्र

ड्राईव्ह टेस्टचा कालावधी

कापलेले अंतर

कामगिरी सारांश असलेले परिशिष्ट

नवी मुंबई

मुंबई

16-12-2024 ते 20-12-2024

शहरः 350.26 किमी

वॉक टेस्टः12.85 किमी

रेल्वेः 31.03 किमी

कोस्टलः 6.71 किमी

परिशिष्ट 

3.या संदर्भातील तपशीलवार अहवाल ट्रायच्या  www.trai.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण/ माहिती यासाठी श्री. तेजपाल सिंग, सल्लागार  (QoS-I) ट्राय यांच्याशी email: adv-qos1@trai.gov.in या ई-मेलवर किंवा +91-11-20907759 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

परिशिष्टासाठी येथे क्लिक करा.

नवी मुंबईचे तपशील परिशिष्ट ई मध्ये आहेत.

Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 2108464) Visitor Counter : 18