सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एआयजेएनआयएसएचडी(डी) तर्फे जागतिक श्रवण दिन साजरा : कान आणि श्रवण निगा राखण्याचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 03 MAR 2025 6:52PM by PIB Mumbai

मुंबई, 3 मार्च 2025


 

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अली यावर जंग नॅशनल स्पीच ॲन्ड हिअरिंग डिसेबिलीटीज (राष्ट्रीय वाचा आणि श्रवण अपंगत्व ) संस्था (दिव्यांगजन) एआयजेएनआयएसएचडी (डी) ने आज जागतिक श्रवण दिन साजरा केला. श्रवणदोषाबद्दल जागरूकता निर्माण करणे, कान आणि श्रवणाबाबत निगा राखण्यास‌ प्रोत्साहन देणे तसेच संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी तातडीने कृती करण्यास उद्युक्त करणे हे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नेतृत्वाखालील या जागतिक आवाहन कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या वर्षीची संकल्पना 'मानसिकता बदलणे : सर्वांसाठी कान आणि श्रवण निगा वास्तवात आणण्यासाठी स्वतःला सक्षम करा', अशी असून ती श्रवण आरोग्याबद्दलच्या धारणांमध्ये बदल करण्याचे आवाहन करते तसेच सक्रिय काळजी घेण्याची गरज अधोरेखित करते. ज्ञानेंद्रियविषयक   अधूपणामध्ये श्रवणशक्ती कमी होणे ही जगभरात मोठ्या प्रमाणात  आढळते, भारतात सुमारे 63 दशलक्ष लोक लक्षणीय श्रवण कमजोरीसह जगत आहेत.जागतिक आरोग्य संघटनेने असा अंदाज वर्तवला आहे की 2030 पर्यंत जगभरातील 500 दशलक्षाहून अधिक लोकांना श्रवणशक्ती कमी होण्याचा अनुभव येईल आणि त्यांना पुनर्वसनाची आवश्यकता भासेल.चिंताजनक म्हणजे, संगीत आणि व्हिडिओ गेमिंगसारख्या मनोरंजकपर माध्यमांद्वारे  मोठ्या आवाजाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे एक अब्जाहून अधिक तरुणांना श्रवणशक्ती कायमस्वरूपी कमी होण्याचा धोका संभवतो.

श्रवण आरोग्याचे भविष्य हे आज उचलल्या जाणाऱ्या आवश्यक पावलांवर अवलंबून आहे. श्रवणशक्ती कमी होण्याचे अनेक प्रकार साध्या परंतु प्रभावी उपायांनी रोखता येतात, जसे की:

  • सुरक्षित श्रवण सवयींचा सराव करणे
  • कानाच्या आजारांचे लवकर निदान आणि उपचार करणे
  • गोंगाटाच्या वातावरणात श्रवण संरक्षण वापरणे
  • नियमित श्रवण तपासणी करणे
  • श्रवणशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना सहाय्यकारी तंत्रज्ञान आणि समावेशक धोरणांद्वारे मदत करणे

या दृष्टिकोनानुसार एआयजेएनआयएसएचडी (डी) व्यक्ती, कुटुंबे, शिक्षक आणि धोरणकर्त्यांना कान आणि श्रवणविषयक निगा राखण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन करते. जागरूकता वाढवून तसेच वर्तनातील बदलांना प्रोत्साहन देऊन आपण अशा भविष्याकडे वाटचाल करू शकतो जिथे प्रत्येकाला प्रभावीपणे ऐकण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळेल. या जागतिक श्रवण दिनाचे औचित्य साधून आम्ही अडथळे दूर करण्यासाठी, हा डाग  दूर करण्यासाठी आणि श्रवणविषयक निगा सर्वांना उपलब्ध आहे याची खात्री करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

सध्या राबविण्यात येणाऱ्या जागरूकता मोहिमेचा एक भाग म्हणून, एआयजेएनआयएसएचडी (डी) ने शैक्षणिक प्रदर्शने, स्पर्धा, वाहतूक पोलिसांसाठी ध्वनी-प्रेरित श्रवणशक्ती कमी होण्याबाबतची मोहीम तसेच वृद्धाश्रमातील रहिवाशांसाठी श्रवण तपासणी  यासह अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. एआयजेएनआयएसएचडी (डी) सर्व वयोगटातील व्यक्तींना शिक्षण, लवकर निदान आणि पुनर्वसनाद्वारे स्वतःच्या कान आणि श्रवण आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम करण्यासाठी समर्पित आहे. चला, चांगल्या श्रवण आरोग्यासाठी एकत्रितपणे जबाबदारी उचलूया आणि श्रवणशक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी अधिक समावेशक समाज निर्माण करूया.

 

 

  

Students of AYJNISHD(D) creating awarness on World Hearing Day through visual campaign

Participants of Exhibition at AYJNISHD(D) on World Hearing Day 3.3.2025

 

 

N.Chitale/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2107824) आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Urdu