कोळसा मंत्रालय
एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत देशाचे एकूण कोळसा उत्पादन 5.73% वाढून 928.95 दशलक्ष टन वर पोहोचले
कोळसा पाठवणी 5.50% वाढून 929.41 मेट्रिक टन वर पोहोचली
Posted On:
01 MAR 2025 5:09PM by PIB Mumbai
भारताच्या कोळसा क्षेत्राने फेब्रुवारी 2025 पर्यंत उत्पादन आणि पाठवणी या दोन्ही क्षेत्रात लक्षणीय वाढ नोंदवत आपली मजबूत कामगिरी कायम ठेवली आहे.

कोळशाचे एकूण उत्पादन 928.95 दशलक्ष मेट्रिक टन वर पोहोचले असून, गेल्या वर्षी याच कालावधीतील 878.55 दशलक्ष मेट्रिक टनांच्या तुलनेत यामध्ये 5.73% वाढ नोंदवली गेली.

त्याचप्रमाणे एकूण कोळसा पाठवणी मध्ये वाढ होऊन ती 929.41 दशलक्ष मेट्रिक टन वर पोहोचली. गेल्या वर्षीच्या 880.92 दशलक्ष मेट्रिक टन च्या तुलनेत त्याने 5.50% वाढ नोंदवली.
फेब्रुवारी 2025 पर्यंत कॅप्टिव्ह (कंपन्यांच्या मालकीची) आणि इतर संस्थांचे कोळसा उत्पादन 173.58 मेट्रिक टन होते, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 133.36 मेट्रिक टन च्या तुलनेत 30.16% अधिक आहे.
त्याचप्रमाणे कॅप्टिव्ह आणि इतर संस्थांकडून फेब्रुवारी 2025 पर्यंत कोळसा पाठवणी 178.02 मेट्रिक टन वर पोहोचली, मागील वर्षी याच कालावधीतील 134.96 मेट्रिक टन च्या तुलनेत ती 31.90% अधिक आहे.
ही मजबूत कामगिरी ऊर्जा सुरक्षा आणि औद्योगिक विकासाप्रति असलेली भारताची वचनबद्धता अधोरेखित करत असून, देश कोळशाच्या वाढत्या मागणीची कार्यक्षमतेने पूर्तता करत असल्याचे सूचित होते. येत्या काही महिन्यांत ही सकारात्मक गती कायम ठेवत, सरकार पायाभूत सुविधांचा विकास आणि परिचालन कार्यक्षमतेला चालना देईल.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107444)
Visitor Counter : 18