संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण राज्यमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे युरोपियन कमिशनच्या संरक्षण आणि अंतराळ आयुक्तांची घेतली भेट

Posted On: 28 FEB 2025 12:20PM by PIB Mumbai

 

संरक्षण राज्यमंत्री  संजय सेठ यांनी आज अर्थात 28  फेब्रुवारी 2025  रोजी नवी दिल्ली येथे युरोपियन कमिशनचे संरक्षण आणि अंतराळ आयुक्त   अँड्रियस कुबिलियस यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यांनी भारत-युरोपियन युनियन द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावर व्यापक चर्चा केली. या चर्चेत   इंडो-पॅसिफिकमधील सागरी संबंध आणि माहितीची देवाणघेवाण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.  संजय सेठ आणि  अँड्रियस कुबिलियस यांनी संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढवण्याचे मार्ग आणि साधने, विशेषतः भारतातील संयुक्त प्रकल्पांमध्ये आणि सह-उत्पादनाच्या संधींमध्ये युरोपियन संरक्षण कंपन्यांचा सहभाग यावर देखील चर्चा केली. युरोपियन युनियनच्या कायमस्वरूपी संरचित सहकार्य आणि इतर युरोपीय विकास प्रकल्पांमध्ये भारतीय सहभागाच्या पद्धतींबाबत त्यांनी विचारविनिमय केला.  अँड्रियस कुबिलियस हे युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा भाग म्हणून कॉलेज ऑफ कमिशनर्ससह भारत दौऱ्यावर येणार आहेत.

***

S.Tupe/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2107159) Visitor Counter : 18