सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादनात 9.2% दराची वाढ मागील 12 वर्षांत 2021-22 हे वर्ष वगळता सर्वोच्च वाढीचा दर


आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.5% राहण्याचा अंदाज

आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादनाने 6.2% वृद्धी दर नोंदवला

Posted On: 28 FEB 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2025

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करून आर्थिक वर्ष  2024-25 साठी देशाच्या वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादनाविषयीचा दुसरा अग्रीम अंदाज जाहीर केला आहे. याचबरोबरीने राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आर्थिक वर्ष 2024-25 मधील ऑक्टोबर - डिसेंबर या तिमाहीसाठी  सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तिमाही अंदाजांसह, त्यातील खर्चाच्या घटकांची माहिती तसेच सकल देशांतर्गत उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, उपभोग्य खर्च, बचत आणि भांडवली निर्मितीचे सुधारित अंदाजही जाहीर केले आहेत.

ठळक वैशिष्ट्ये:

  1. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन 6.5% ने वाढेल असा अंदाज आहे. नाममूल्य सकल देशांतर्गत उत्पादन 9.9% दराने वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही दरांमध्ये त्यांच्या पहिल्या अग्रीम अंदाजांच्या तुलनेत वाढ केली गेली आहे.
  2. पहिल्या सुधारित अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वास्तविक सकल देशांतर्गत उत्पदन  9.2% दराने वाढले असून, मागील 12 वर्षांत कोविड महामारीनंतरचे  2021-22 हे वर्ष वगळता हा सर्वोच्च वाढीचा दर आहे. सकल देशांतर्गत उत्पादनाच्या या वाढीमध्ये निर्मिती क्षेत्रातील 12.3%, बांधकाम’ क्षेत्रातील 10.4% आणि आर्थिक, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रातील 10.3% अशा दुहेरी अंकांत झालेल्या वाढीचे मोठे योगदान आहे.
  3. अंतिम अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7.6% इतका होता. या वाढीमागे प्रामुख्याने व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, संवाद आणि प्रसारणाशी संबंधित सेवा क्षेत्रातील 12.3% दराने झालेली वाढ, त्याचबरोबरीने आर्थिक, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रातील 10.8% दराने झालेली वाढ आणि वीज, वायू, जलपुरवठा आणि इतर उपयुक्त सुविधा सेवा क्षेत्रातील 10.8% दराने झालेल्या वाढीचे मोठे योगदान राहीले आहे.
  4. आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन 6.2% दराची वाढ दिसून आली आहे. या तिमाहीत नाममूल्य सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 9.9% इतका राहीला आहे.
  5. आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत  वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर सुधारून 5.6% केला गेला आहे.
  6. 2024-25 मध्ये बांधकाम क्षेत्राच्या वाढीचा दर 8.6% राहण्याचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ  आर्थिक, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर 7.2% इतका तर  व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, संवाद आणि प्रसारणाशी संबंधित सेवा क्षेत्राचा दर  6.4% राहण्याचा अंदाज आहे.
  7. 2024-25 मध्ये खाजगी स्वरुपातील अंतिम उपभोग्य खर्च (PFCE)  7.6% अशी चांगली वाढ नोंदवण्याची  अपेक्षा असून, 2023-24 मधील 5.6% इतक्या वाढीच्या  तुलनेत हा दर अधिक  राहणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Kakade/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2107085) Visitor Counter : 92


Read this release in: Hindi , English