अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमाशुल्क विभागाच्या मुंबई शाखेने विमानतळावर 10 कोटी रुपयांचे अवैध मादक पदार्थ जप्‍त करून, एकाला केली अटक

Posted On: 20 FEB 2025 7:26PM by PIB Mumbai

मुंबई, 20 फेब्रुवारी 2025


मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मंगळवारी (18 फेब्रुवारी 2025) 1.022 किलो वजनाचे अवैध कोकेन/मेथाक्वॉलोन जप्त केले.या अंमली पदार्थांचे  बाजार मूल्य सुमारे 10.22. कोटी रुपये) आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला  अटक करण्यात आली.

रविवारी (16 फेब्रुवारी, 2025), युगांडा एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक UR 430 ने एंटेबे, युगांडा येथून मुंबईला आलेल्या एका संशयित प्रवाशाला रोखण्यात आले.प्रवासाचे तपशील आणि मुंबईला भेट देण्याच्या उद्देशाबाबत विचारणा करताना, या प्रवाशाने अस्वस्थता दाखवली  आणि पांढऱ्या रंगाच्या  काही कॅप्सूलचे सेवन केल्याचे कबूल केले.हे ‘एनडीपीएस’  असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर प्रवाशाला वैद्यकीय देखरेखीखाली बरे वाटल्यानंतर, आदेश देण्याच्या विनंतीसह  न्यायदंडाधिकारी यांच्याकडे नेण्यात आले. पुढील तीन दिवसांत, या प्रवाशाकडून 84 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. याचबरोबर  वैद्यकीय सहाय्याने त्याच्याकडून एकूण 1.022 किलो पांढरा चुरा केलेला पदार्थ कोकेन/मेथाक्वॉलोन जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

 


S.Bedekar/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2105091) अभ्यागत कक्ष : 48
Read this releasein: English