आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासींच्या उद्योजकता विकासासाठी ट्रायफेडचे रिलायन्स रिटेल, एचसीएल फाउंडेशन आणि तोराजामेलो इंडोनेशियासोबत सामंजस्य करार
Posted On:
20 FEB 2025 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025
आदिवासी सक्षमीकरणासाठी आणि आदिवासी लोकसंख्येला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘ट्रायफेड’अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ विविध दूरदर्शी पावले उचलत आहे. या दिशेने एक उपक्रम म्हणजे आदिवासी व्यवसायांना सुविधा मिळण्यासाठी ट्रायफेड ने रिलायन्स रिटेल, एचसीएल फाउंडेशन आणि तोराजामेलो इंडोनेशिया सोबत भागीदारी केली आहे ज्याद्वारे ग्रामीण भारतातील लाखो आदिवासी राष्ट्रीय स्तरावर मुख्य प्रवाहात येतील.
राष्ट्रीय राजधानीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये 16 ते 24 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित 'आदी महोत्सव' या पथदर्शी कार्यक्रमादरम्यान 19 फेब्रुवारी रोजी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, जे बी 2 बी (व्यवसाय ते व्यवसाय) दृष्टिकोनाची अंमलबजावणी आणि आदिवासी उत्पादन बाजारपेठ वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
देशभरातील आदिवासी समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासाकडे नेणाऱ्या विविध पैलूंवर ट्रायफेडच्या महाव्यवस्थापकांनी अनुक्रमे रिलायन्स रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री प्रदीप रामचंद्रन, एचसीएल फाउंडेशनच्या ग्लोबल सीएसआर प्रमुख डॉ. निधी पुंधीर आणि इंडोनेशियातील तोराजामेलोच्या सीईओ अपर्णा सक्सेना भटनागर यांच्याशी हे सामंजस्य करार केले.
रिलायन्स रिटेलला मोठ्या प्रमाणात आदिवासी उत्पादनांचा पुरवठा करणे हा रिलायन्स रिटेल सोबतच्या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे; या सहकार्यामुळे आदिवासी उत्पादनांचे शाश्वत स्रोत उपक्रम राबवण्यास, ब्रँडिंग आणि प्रचार करण्यास देखील मदत होईल.

एचसीएल फाउंडेशन आदिवासी कारागिरांसोबत दीर्घकालीन सहकार्य प्रस्थापित करण्यास मदत करेल जेणेकरून उत्पादन पोर्टफोलिओ वाढविण्यासाठी आणि त्यांच्या विविध प्लॅटफॉर्मद्वारे विद्यमान उत्पादनांचा प्रचार करण्याकरिता क्षमता बांधणी आणि नवीन प्रशिक्षण प्रदान केले जाईल.

तोराजामेलोसोबतच्या सहकार्यामुळे इंडोनेशियामध्ये भारतीय आदिवासी उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय विपणन आणि विक्री मार्गांचा विस्तार करण्यात मदत होईल. यामुळे भारतीय आदिवासी कारागिरांसाठी नवीन बाजारपेठा खुल्या होण्याबरोबरच कारागिरांमध्ये एक अनोखी सांस्कृतिक देवाणघेवाण देखील होईल.

S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105086)
Visitor Counter : 28