माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज (WAVES) मधील 'गेम फोर्ज' कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली गेमिंग क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीची माहिती
हँडहेल्ड गेमिंग टेक्नॉलॉजीच्या यशाबद्दल जाणून घेण्यासाठी चेन्नई, बंगळूरू आणि हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमांना 2000 हून अधिक लोकांची उपस्थिती
वेव्हज (WAVES), अत्याधुनिक कौशल्य विकासासह भारताच्या गेमिंग उद्योगात क्रांती घडवून आणणार
Posted On:
18 FEB 2025 9:48PM by PIB Mumbai
मुंबई, 18 फेब्रुवारी 2025
भारताच्या डिजिटल गेमिंग क्षेत्रातील नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी (आयडीजीएस) ने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहयोगाने, WAVES (वेव्हज), म्हणजेच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट परिषदेच्या जनसंपर्क कार्यक्रमांचा एक भाग म्हणून देशातील विविध शहरांमध्ये कार्यक्रम मालिका आयोजित केली होती.
आयडीजीएसचा कौशल्य-समन्वय उपक्रम असलेला 'गेम फोर्ज' हा चार दिवसीय कार्यक्रम 15 फेब्रुवारी 2025 रोजी नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमएस), हैदराबाद, येथे संपन्न झाला. आयडीजीएसने यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी सविता अभियांत्रिकी महाविद्यालय, चेन्नई, 12 फेब्रुवारी रोजी आरएनएस फर्स्ट ग्रेड कॉलेज, बंगळूरू, आणि 14 फेब्रुवारी रोजी अनुराग विद्यापीठ, हैदराबाद येथे अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित कारण्यात आलेली Innovate2Educate हँडहेल्ड डिव्हाइस स्पर्धा, .हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते, जिथे सहभागींना डिजिटल लर्निंग अनुभवत परिवर्तन घडवण्यासाठी,सहभागींना नवोन्मेषी गेमिंग डिव्हाइसची ओळख करून देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
चेन्नई येथील सविता अभियांत्रिकी महाविद्यालयात गेम फोर्ज
गेमिंग, व्हीएफएक्स आणि व्हर्च्युअल उत्पादनाच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करत, 10 फेब्रुवारी 2025 रोजी चेन्नईच्या सविता अभियांत्रिकी महाविद्यालयात गेम फोर्ज कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
आयसीटी अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत व्ही आणि सिनेमा फॅक्टरी अॅकॅडमीचे व्हर्च्युअल प्रॉडक्शन मेंटॉर शिव शंकर या उद्योगजगतातील धुरिणांनी अनरिअल इंजिन आणि इन-कॅमेरा व्हीएफएक्स तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणावरील चर्चेत भाग घेतला, चित्रपट निर्मिती आणि इंटरॅक्टिव्ह मीडियामध्ये ते क्रांती घडवत आहे.
या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रतिनिधीने एक ऑनलाइन सत्र देखील आयोजित केले होते, ज्यात वेव्हज आणि इनोव्हेट 2 एज्युकेट चे प्रशिक्षण आणि गेमिंगमध्ये बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट कसे आहे, यावर भर देण्यात आला.

बंगळूरू येथील आरएनएस फर्स्ट ग्रेड कॉलेजमध्ये गेम फोर्ज
12 फेब्रुवारी 2025 रोजी, बंगळूरू येथील आरएनएस फर्स्ट ग्रेड कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माहितीपूर्ण स्किलसिंक कार्यशाळेत गेमिंग उद्योगातील करिअरच्या संधींचा शोध घेण्यात आला. कार्यशाळेच्या पॅनेलमध्ये न्यूकबॉक्स स्टुडिओचे सीईओ बिप्लव बेलवाल आणि एनव्हीआयडीआयए इंडियाचे डेस्कटॉप चॅनेल मार्केटिंग मॅनेजर योगेश नागदेव यांच्यासारख्या मान्यवरांचा समावेश होता.

गेमिंग उद्योगाच्या आंतरविद्याशाखीय स्वरूपावर भर देत, त्यांनी गेम डिझाईन, प्रोग्रामिंग लँग्वेज आणि वापरकर्त्याचा अनुभव (यूआय / यूएक्स), यावर मोलाची माहिती दिली.
आपले विद्यार्थी वेगाने विकसित होणाऱ्या गेमिंग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज असतील याची सुनिश्चिती करत शिक्षण क्षेत्र आणि मनोरंजन उद्योग यांच्यातील दरी सांधणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
हैदराबाद येथील अनुराग विद्यापीठात आयोजित गेम फोर्ज
गेमिंग आणि ॲनिमेशन क्षेत्राच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करत 14 फेब्रुवारी 2025 रोजी हैदराबाद येथील अनुराग विद्यापीठाने एक चित्तवेधक सत्र आयोजित केले. आयडीजीएसचे प्रमुख सुभाष सप्रू यांनी या सत्रात मोबाईल गेमिंग नवोन्मेष क्षेत्रात जागतिक नेता होण्याच्या भारताच्या क्षमतेवर भाष्य केले. या कार्यक्रमात तज्ञांनी आधुनिक ग्राफिक्स, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि गेमिंग तसेच अॅनिमेशन उद्योगावर त्यांचा होणारा परिणाम याबाबत मौलिक विचार मांडले.
यावेळी झालेल्या चर्चेत डिजिटल मनोरंजनाच्या भविष्याला आकार देण्यात भारताच्या वाढत्या भूमिकेचा पुनरुच्चार करत गेम डिझाईन, बाजारपेठ विस्तार आणि एआय-संचालित गेम अनुभव अशा मुद्यांचा समावेश करण्यात आला.
हैदराबाद येथील एनएमआयएमएस संस्थेत आयोजित गेम फोर्ज
गेमिंग, एआय आणि सामग्री निर्मिती यांच्या एकमेकांमधील मिश्र प्रकारांवर आयोजित विशेष सत्रासह 15 फेब्रुवारी 2025 रोजी हैदराबाद येथे एनएमआयएमएस संस्थेत आयोजित गेम फोर्ज उपक्रम संपन्न झाला. एनव्हीआयडीआयए इंडिया मधील योगेश नागदेव आणि विशाल पेरिफेरल्स संस्थेचे विकास हिसारीया यांच्यासारख्या अनेक तज्ञांनी सुधारित वास्तवतेपासून ते एआय संचालित गेम डिझाईन पर्यंत गेमिंग मध्ये एआयच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल विचार मांडले.

या सत्रात एआयची विकसित होत जाणारी भूमिका आणि एआय, गेमिंग आणि सामग्री निर्मितीमध्ये असलेले कारकीर्दीचे मार्ग याबाबत विवेचन करण्यात आले. तसेच उद्योगाच्या गरजा आणि परंपरागत शिक्षण यांच्यातील दरी भरून काढण्याच्या महत्त्वावर या सत्रात अधिक भर देण्यात आला.
गेम फोर्ज उपक्रमाच्या यशाने चैतन्यमय डिजिटल मनोरंजन क्षेत्रात नावारूपाला येण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी नव्या पिढीला सक्षम करत उद्योग क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांना एकमेकांशी जोडण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले.
मुंबई येथे 1 ते 4 मे 2025 या काळात आयोजित करण्यात आलेल्या वेव्हज या कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी या गेम फोर्ज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दृक-श्राव्य तंत्रज्ञान, गुंगवून टाकणारे मनोरंजन, अभिनव कॉमिक्स डिझाईन आणि एआय व इतर पारंपरिक तसेच आधुनिक साधनांचा वापर करून सामग्री निर्मिती क्षेत्रातील अत्याधुनिक घडामोडींसाठी वेव्हज परिषद एका जागतिक मंचाचे कार्य करेल. हा कार्यक्रम या क्षेत्रातील संभावना, आव्हाने यांची चर्चा करण्यासाठी तसेच जागतिक व्यापाराला प्रोत्साहन देऊन या क्षेत्राच्या भविष्यावर प्रभाव टाकण्यासाठी मनोरंजन उद्योगातील आघाडीचे नेते, भागधारक आणि संशोधक यांना एकत्र आणेल.
S.Patil/R.Agashe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104527)
Visitor Counter : 10