वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
एप्रिल-जानेवारी 2023-24 मधील 636.69 अब्ज अमेरिकन डॉलर्स च्या तुलनेत एप्रिल-जानेवारी 2024-25 या कालावधीत एकूण निर्यात (माल आणि सेवा) सुमारे 7.21% वृद्धीसह 682.59 अब्ज अमेरिकन डॉलर्स असल्याचा अंदाज
जानेवारी 2025 मध्ये व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत वाढ होण्याचे प्रमुख घटक म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधे आणि फार्मास्युटिकल्स, तांदूळ आणि रत्ने व आभूषणे
Posted On:
17 FEB 2025 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025
जानेवारी 2025 मध्ये भारताची एकूण निर्यात (माल आणि सेवा एकत्रित) 74.97 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज आहे, जी जानेवारी 2024 च्या तुलनेत 9.72 टक्के सकारात्मक वाढ दर्शवते. जानेवारी 2025 मध्ये एकूण आयात (माल आणि सेवा एकत्रित) 77.64 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज आहे, जी जानेवारी 2024 च्या तुलनेत 12.98 टक्के सकारात्मक वाढ दर्शवते.
तक्ता 1: जानेवारी 2025 दरम्यानचा व्यापार*
|
January2025
(USD Billion)
|
January2024
(USD Billion)
|
Merchandise
|
Exports
|
36.43
|
37.32
|
Imports
|
59.42
|
53.88
|
Services*
|
Exports
|
38.55
|
31.01
|
Imports
|
18.22
|
14.84
|
Total Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
74.97
|
68.33
|
Imports
|
77.64
|
68.72
|
Trade Balance
|
-2.67
|
-0.39
|
टीप: भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेली सेवा क्षेत्राची ताजी आकडेवारी डिसेंबर 2024 साठी आहे. जानेवारी 2025 ची आकडेवारी हा एक अंदाज आहे, ज्यात आरबीआयच्या त्यानंतरच्या प्रकाशनाच्या आधारे सुधारणा केली जाईल. (ii) एप्रिल-जानेवारी 2023-24 आणि एप्रिल-सप्टेंबर 2024 चा डेटा तिमाही बॅलन्स ऑफ पेमेंट डेटा वापरून प्रो-रेटा आधारावर सुधारित करण्यात आला आहे.
आकृती 1: जानेवारी 2025 दरम्यान एकूण व्यापार*

एप्रिल-जानेवारी 2024-25 दरम्यान भारताची एकूण निर्यात* 7.21 टक्के सकारात्मक वाढीसह 682.59 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी असल्याचा अंदाज आहे. एप्रिल-जानेवारी 2024-25 दरम्यान एकूण आयात 8.96 टक्के वाढीसह 770.06 अब्ज अमेरिकन डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.
तक्ता 2: एप्रिल-जानेवारी 2024-25 दरम्यान व्यापार*
|
April-January2024-25
(USD Billion)
|
April-January2023-24
(USD Billion)
|
Merchandise
|
Exports
|
358.91
|
353.97
|
Imports
|
601.90
|
560.27
|
Services*
|
Exports
|
323.68
|
282.71
|
Imports
|
168.17
|
146.48
|
Total Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
682.59
|
636.69
|
Imports
|
770.06
|
706.75
|
Trade Balance
|
-87.47
|
-70.06
|

आकृती 2: एप्रिल-जानेवारी 2024-25 दरम्यान एकूण व्यापार*
वाणिज्य व्यापार
जानेवारी 2025 मध्ये वाणिज्य मालाची निर्यात जानेवारी 2024 मधील 37.32 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 36.43 अब्ज डॉलर्स इतकी होती.
जानेवारी 2025 मध्ये वाणिज्य मालाची आयात जानेवारी 2024 मधील 53.88 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 59.42 अब्ज डॉलर्स होती.
आकृती 3: जानेवारी 2025 दरम्यान वाणिज्य व्यापार

एप्रिल-जानेवारी 2024-25 दरम्यान व्यापारी मालाची निर्यात एप्रिल-जानेवारी 2023-24 मधील 353.97 अब्ज अमेरिकन डॉलर्स च्या तुलनेत 358.91 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती.
एप्रिल-जानेवारी 2024-25 दरम्यान व्यापारी मालाची आयात 601.90 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती, तर एप्रिल-जानेवारी 2023-24 दरम्यान ती 560.27 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
एप्रिल-जानेवारी 2024-25 दरम्यान वाणिज्य व्यापार तूट 242.99 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती, जी एप्रिल-जानेवारी 2023-24 दरम्यान 206.29 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
आकृती 4: एप्रिल-जानेवारी 2024-25 दरम्यान वाणिज्य व्यापार

जानेवारी 2024 मधील 26.12 अब्ज अमेरिकन डॉलर्स च्या तुलनेत 2025 मध्ये पेट्रोलियम पदार्थ आणि रत्ने, आभूषणे वगळता निर्यात 29.87 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
जानेवारी 2024 मधील 34.23 अब्ज अमेरिकन डॉलर्स च्या तुलनेत 2025 मध्ये पेट्रोलियम, रत्ने आणि दागिने (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) व्यतिरिक्त इतर वस्तूंची आयात 41.20 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
तक्ता 3: जानेवारी 2025 दरम्यान पेट्रोलियम आणि रत्ने आणि दागिने खेरीज व्यापार
January2025
(USD Billion)
|
January2024
(USD Billion)
|
Non- petroleum exports
|
32.86
|
28.71
|
Non- petroleum imports
|
45.99
|
38.35
|
Non-petroleum & Non-Gems & Jewellery exports
|
29.87
|
26.12
|
Non-petroleum & Non-Gems & Jewellery imports
|
41.20
|
34.23
|
टीप: रत्ने आणि दागिन्यांच्या आयातीत सोने, चांदी आणि मोती, मौल्यवान आणि निम्न-मौल्यवान खड्यांचा समावेश आहे
आकृती 5: जानेवारी 2025 दरम्यान पेट्रोलियम पदार्थ आणि रत्ने आणि दागिने खेरीज व्यापार

एप्रिल-जानेवारी 2024-25 मध्ये पेट्रोलियम पदार्थ आणि रत्ने आणि दागिने वगळता निर्यात 281.46 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती, जी एप्रिल-जानेवारी 2023-24 मध्ये 256.56 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
पेट्रोलियम पदार्थ, रत्ने आणि दागिने खेरीज (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) एप्रिल-जानेवारी 2024-25 मध्ये आयात 378.34 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती, जी एप्रिल-जानेवारी 2023-24 मध्ये 354.86 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
तक्ता 4: एप्रिल-जानेवारी 2024-25 दरम्यान पेट्रोलियम आणि रत्ने आणि दागिने वगळून व्यापार
April-January2024-25
(USD Billion)
|
April-January2023-24
(USD Billion)
|
Non- petroleum exports
|
305.84
|
283.45
|
Non- petroleum imports
|
447.06
|
414.77
|
Non-petroleum &Non Gems& Jewellery exports
|
281.46
|
256.56
|
Non-petroleum & Non Gems & Jewellery imports
|
378.34
|
35
|
टीप: रत्ने आणि दागिन्यांच्या आयातीत सोने, चांदी आणि मोती, मौल्यवान आणि निम्न-मौल्यवान खड्यांचा समावेश आहे.
आकृती 6: एप्रिल-जानेवारी 2024-25 दरम्यान पेट्रोलियम पदार्थ आणि रत्ने आणि दागिने वगळून व्यापार

सेवा व्यापार
जानेवारी 2025 मध्ये सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य 38.55 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे जे जानेवारी 2024 मध्ये 31.01 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते.
जानेवारी 2025 मध्ये सेवा आयातीचे अंदाजे मूल्य 18.22 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे जे जानेवारी 2024 मध्ये 14.84 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते.
आकृती 7: जानेवारी 2025 मध्ये सेवा व्यापार *

एप्रिल-जानेवारी 2024-25 मध्ये सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य 323.68 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे जे एप्रिल-जानेवारी 2023-24 मध्ये 282.71 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते.
एप्रिल-जानेवारी 2023-24 मधील 146.48 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत एप्रिल-जानेवारी 2024-25 मध्ये सेवा आयातीचे अंदाजे मूल्य 168.17 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.
एप्रिल-जानेवारी 2024-25 मध्ये सेवा व्यापार अधिशेष 155.52 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे जो एप्रिल-जानेवारी 2023-24 मध्ये 136.23 अब्ज अमेरिकन डॉलर्स होता.
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104248)
Visitor Counter : 78