भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

निवडणूक आयोगाने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना कृतज्ञतेने दिला निरोप

प्रविष्टि तिथि: 17 FEB 2025 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी 2025

भारत निवडणूक आयोगाने आज देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना त्यांच्या कार्यकालासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञतेने निरोप दिला.राजीव कुमार यांचा कार्यकाळ उद्या दि. 18.02.2025 संपणार आहे.

राजीव कुमार 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून भारत निवडणूक आयोगात रुजू झाले होते. त्यानंतर 15 मे 2022 रोजी देशाचे  25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता. अतिशय संयतपणाणे घडवून आणलेले आमूलाग्र बदल हे भारत निवडणूक आयोगातील त्यांच्या 4.5 वर्षांच्या कार्यकाळाचे वैशिष्ट्य ठरले. या काळात त्यांनी निवडणूक यंत्रणेशी संबंधीत विविध क्षेत्रांमध्ये संरचनात्मक, तंत्रज्ञान विषयक, क्षमता वृद्धी, संवाद, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि प्रशासन या सर्व बाबतींमध्ये महत्वाचे बदल घडवून आणले. राजीव कुमार यांनी त्यांच्या  कार्यकाळात 31 राज्य / केंद्रशासित प्रदेशांमधील निवडणुका, 2022 मधील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका, 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि तसेच राज्यसभा सदस्यांच्या निवडणुका अशा सर्वच प्रकारच्या निवडणुकांची जबाबदारी पार पाडत, एका अर्थाने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित संपूर्ण चक्र पार केले. त्यांची ही कामगिरी देशाच्या निवडणूक व्यवस्थापनातील एक दुर्मिळ आणि ऐतिहासिक यश आहे. त्यांनी जबाबदारी सांभाळलेल्या सर्वच निवडणुका अत्यंत शांततेत पार पडल्या, तसेच या निवडणुकांच्या बाबतीत पुन्हा मतदान घेण्याचे तसेच निवडणुकीतील हिंसाचाराचे प्रसंग जववळपास शून्यावर असणे हे त्यांच्या कार्यकाळातले महत्वाचे यश ठरले आहे.

आपल्या निरोप समारंभाच्या वेळी केलेल्या भाषणात देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देशभरातील 15 दशलक्ष मतदान अधिकाऱ्यांचे, त्यांनी लोकशाही मूल्ये जपण्यासाठी दर्शवलेल्या समर्पण भावनेबद्दल आभार मानले. देशातील लोकशाही संस्थांवर  वितुष्ट हेतूने  हल्ले होत आहेत, मात्र देशाच्या जवळपास 1 अब्ज मतदारांच्या  विश्वासापुढे या हल्ल्यांचा निभाव लागला नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. निवडणुकांची जबाबदारी पार पाडत असताना सायबर हल्ले तसेच समाजमाध्यमांवर पसरवली जाणारी खोटी माहिती अशा धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मार्ग स्वीकारला पाहिजे  ही बाबही राजीव कुमार यांनी यावेळी अधोरेखीत केली. देशभरातील मतदारांनी विशेषत: महिला मतदारांनी उत्साहाने दिलेल्या सहभागाचेही त्यांनी कौतुक केले. आता आपली निवडणूक प्रक्रिया ही अधिकाधिक समावेशक होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची बाबही त्यांनी यावेळी नमूद केली.

राजीव कुमार यांचे संपूर्ण भाषण इथे जोडले आहे.


S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2104247) आगंतुक पटल : 336
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी