आदिवासी विकास मंत्रालय
राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या ‘आदि महोत्सव 2025’चे उद्घाटन
Posted On:
15 FEB 2025 7:02PM by PIB Mumbai
आदिवासी कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित (ट्रायफेड) प्रतिष्ठित 'आदि महोत्सव 2025' चे आयोजन करत असून हा भव्य महोत्सव 16 ते 24 फेब्रुवारी 2025 दरम्यान मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, नवी दिल्ली येथे भरवण्यात येणार आहे. भारतातील आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, वारसा आणि आर्थिक क्षमता यांचे प्रभावी सादरीकरण करण्याचा हा महत्त्वाचा उपक्रम आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उद्घाटन समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचा शुभारंभ करतील. या महोत्सवात 600 हून अधिक आदिवासी कारागीर, 500 कलाकार आणि 25 विशेष आदिवासी खाद्यपदार्थांची दालने असणार आहेत. या महोत्सवात 30 पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील विविध परंपरांचा समृद्ध वारसा अनुभवायला मिळेल.
आदी महोत्सव 2025 ची प्रमुख वैशिष्ट्ये:
• विविध राज्यांतील आदिवासी कारागिरांकडून हस्तकलेचे प्रात्यक्षिक
• 20 सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (पीएसयु) आणि 35 प्रशिक्षण संस्थांशी भागीदारी
• डिझाइन संस्थांशी आणि कॉर्पोरेट कंपन्यांशी 25 हून अधिक सामंजस्य करार (एमओयु) करण्यात येणार
• राज्य आणि आंतरराष्ट्रीय पॅव्हेलियन मध्ये आदिवासी हस्तकलेचे भव्य प्रदर्शन
• 8 प्रमुख ई-कॉमर्स व्यासपीठांवर आदिवासी उत्पादनांचे ब्रँड इंटिग्रेशन
• श्रीलंका आणि इंडोनेशियाच्या प्रतिनिधींचा विशेष सहभाग
• आदिवासी पाककृतींच्या डिजिटल समावेशासाठी आयएफसीए सोबत भागीदारी
• एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी (ईएमआरसी) प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धीसाठी नेस्ट सोबत सामंजस्य करार (एमओयु)
***
S.Kane/G.DeodaP.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2103665)
Visitor Counter : 50