पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दुबईतील जागतिक सरकार शिखर परिषद 2025 मध्ये मोबिलिटीच्या भविष्यावरील उच्चस्तरीय गोलमेज परिषदेला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले संबोधित


नवोपक्रम, भागीदारी, स्मार्ट, लवचिक आणि अनुकूल मोबिलिटी उपाय तयार करण्यासाठी सामूहिक दृष्टीकोन आवश्यक: भूपेंद्र यादव

प्रविष्टि तिथि: 11 FEB 2025 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025


केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज दुबईत सुरू असलेल्या जागतिक सरकार शिखर परिषद 2025 मध्ये मोबिलिटीच्या भविष्यावरील उच्चस्तरीय गोलमेज परिषदेला संबोधित केले. भूपेंद्र यादव यांनी भारतासह कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची जीवनरेखा म्हणून मोबिलिटी अर्थात  'गतिशीलता'चा उल्लेख केला. गेल्या वर्षभरात भारतात या उद्योगाने 12% ची वाढ नोंदवली असून त्यामुळे जागतिक नवोन्मेष आणि उत्पादन केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक बळकट झाली आहे, अशी माहिती यादव यांनी उपस्थितांना दिली.

2070 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन लक्ष्य गाठण्याच्या भारताच्या दीर्घकालीन उद्दिष्टाचा संदर्भ देत, यादव म्हणाले की भारताने या दिशेने अनेक निर्णय घेतले आहेत जे त्याच्या विकासाच्या आदर्शाशी सुसंगत आहेत. भारत सरकार आपले दीर्घकालीन निम्न  कार्बन विकास धोरण लक्ष्य साध्य करण्यासाठी सक्रिय धोरणात्मक पुढाकार घेत आहे आणि आराखडे विकसित करत आहे. यामध्ये एकात्मिक, समावेशक आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था विकसित करणे यासह प्रमुख संक्रमण रूपरेषा आहे.

शाश्वत वाहतूक व्यवस्था विकसित करताना उत्सर्जनापासून आर्थिक विकासाला वेगळे करण्यासाठी विविध क्षेत्रांकडून समन्वित प्रयत्नांची आवश्यकता यावर यादव यांनी भर दिला.

याशिवाय, शाश्वत गतिशीलतेला चालना देण्यासाठी, भारत सरकारने जागतिक इलेक्ट्रिक वाहन  कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि भारताला अत्याधुनिक ईव्हीचे प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी विविध पद्धतीने प्रोत्साहने देणारे एक नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शाश्वत वाहतुकीकडे संक्रमण वाढविण्यासाठी, सरकारने प्रधानमंत्री ई-ड्राइव्ह नावाच्या 1.3 अब्ज डॉलर्सच्या प्रोत्साहन योजनेला मान्यता दिली आहे.

देशातील शहरी भागात हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी सरकारच्या राष्ट्रीय शाश्वत अधिवास अभियान (NMSH) आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान (NGHM) सारख्या उपक्रमांची माहितीही यादव यांनी दिली.

सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत बोलताना, सेमीकंडक्टर्सच्या महत्त्वाची भूमिका ओळखून भारताने देशात सेमीकंडक्टर्सच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

“आपण गतिशीलतेच्या परिवर्तनाच्या युगाच्या उंबरठ्यावर उभे असताना, नवोन्मेष, भागीदारी, स्मार्ट, जुळवून घेणारे आणि अनुकूल गतिशीलता उपाय तयार करण्यासाठी सामूहिक दृष्टिकोन आवश्यक आहे, असे यादव यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले.


N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2102043) आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी