ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
‘बीआयएस’ मुंबई शाखेतर्फे मीरा रोड आणि कल्याणच्या सराफांसाठी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
29 JAN 2025 9:04PM by PIB Mumbai
मुंबई, 29 जानेवारी 2025
बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालय-दोनच्या वतीने मीरा-भाईंदर आणि कल्याण ज्वेलर्स असोसिएशनच्या सहकार्याने 27 आणि 28 जानेवारी 2025 रोजी बीआयएस प्रमाणन, हॉलमार्किंग आणि बीआयएस केअर अॅप याविषयी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमांमध्ये 175 पेक्षा जास्तअ सराफ सहभागी झाले होते. यामध्येआ सराफांना दागिने उद्योगातील गुणवत्ता हमीचे महत्त्व आणि ग्राहक संरक्षण याबद्दल शिक्षित करण्यात आले. 27 जानेवारी रोजी मीरा रोड येथील सत्रात, अमन सिंग (एससी.सी), प्रतीक मेश्राम (एसएसए) आणि नरेश हरड (एचएमआर) यांनी मार्गदर्शन केले. वक्त्यांनी दागिन्यांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यात आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण करण्यात ‘बीआयएस’ मानकांच्या भूमिकेवर भर दिला. यावेळी अमन सिंग यांनी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (एचयूआयडी) प्रणालीचे सखोल स्पष्टीकरण दिले आणि बीआयएस केअर अॅपचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. मीरा-भाईंदर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष भवरलाल मेहता यांनी सराफांनी अनिवार्य हॉलमार्किंग ऑर्डर नुसार फक्त ‘एचयूआयडी’चे अनुपालन करणारे दागिने विकण्याची आवश्यकता अधोरेखित केली. प्रमुख चर्चेमध्ये अनुपालन प्रक्रिया, अयशस्वी नमुन्यांसाठी जबाबदारी आणि सराफांनी करावे लागणारे सुधारणात्मक उपाय यांचा समावेश होता.

दुस-या दिवशी – 28 जानेवारी रोजी कल्याण येथे घेतलेल्या सत्रात शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासासाठी बीआयएस मानकांवर लक्ष केंद्रित केले गेले. यावेळी बीआयएसचे अधिकारी महेंद्र सिंग जाखड, अनुराग, प्रतीक मेश्राम आणि नरेश हरड यांनी पारदर्शकता आणि प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यात एचयूआयडी प्रणालीची भूमिका स्पष्ट करणाऱ्या चर्चांचे नेतृत्व केले. त्यानंतर बीआयएस केअर अॅपचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. कल्याण ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी सराफांनी सर्व दागिन्यांसाठी अनिवार्य एचयूआयडी हॉलमार्किंगचे पालन करण्याचे आवाहन केले.

या दोन्ही कार्यक्रमांमध्ये नमुना चाचणीतील अपयश, एचयूआयडीच्या रेकॉर्डची देखभाल आणि अनुपालन समस्यांबद्दल संवादात्मक प्रश्नोत्तराचे सत्रे आयोजित केले होते. या सत्रांमध्येि 23जून 2021 रोजी जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे महत्त्व अधोरेखित केले. या आदेशानुसार एचयूआयडी आणि हॉलमार्किंग अनिवार्य आहे. या नियमनामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये किमान एक मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्र उपलब्ध आहे, तेथे हॉलमार्किंग केले जाते. या जागरूकता उपक्रमांनी बीआयएसच्या नियमांविषयी जागरूकता वाढवण्यास मदत केली. अनुपालनाला प्रोत्साहन देऊन, बीआयएस चे उद्दिष्ट सराफांना उच्च दर्जाची उत्पादने राखण्यास मदत करणे आहे. त्याकमुळे ग्राहकांचा विश्वास निर्माण होते. बीआयएसने ग्राहकांना एचयूआयडी चिन्हांकित केलेल्या दागिन्यांची सत्यता पडताळण्यासाठी बीआयएस केअर अॅप वापरण्यास प्रोत्साहित केले.

* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2097473)
Visitor Counter : 65