ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-I मुख्यालयात 22 व्या प्रादेशिक व्यावसायिक मंडळ संमेलनाचे आयोजन

Posted On: 28 JAN 2025 7:52PM by PIB Mumbai

मुंबई, 28 जानेवारी 2025


एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-I मुख्यालयात (डब्ल्यूआर-I मुख्यालय) आज 22 वे प्रादेशिक व्यावसायिक मंडळ (पीसी) संमेलन आयोजित करण्यात आले होते. एनटीपीसीच्या कामकाजात नवोन्मेश आणि उत्कृष्टतेला चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे. एनटीपीसीचे प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम-I) कमलेश सोनी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी यावेळी ऊर्जा क्षेत्राचा विकसित होत असलेला परिप्रेक्ष्य आणि संस्थात्मक यशामधील  नवोन्मेशाची भूमिका याबद्दलचा आपला दृष्टीकोन मांडला.

आपल्या प्रास्ताविकात कमलेश सोनी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि एनटीपीसी मध्ये   नवोन्मेषाची भावना महत्वाची असल्याचे अधोरेखित केले. नवोन्मेश हा केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित नसून, तो प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूल्यांमध्ये खोलवर रुजलेला असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हीच भावना जोपासण्यासाठी एनटीपीसीने 1999 मध्ये प्रोफेशनल सर्कल (व्यावसायिक मंडळ) चळवळ सुरू केली होती, जी तेव्हापासून संस्थेच्या सर्व पातळ्यांवर सातत्याने सुधारणा घडवून आणणारी प्रेरक शक्ती बनली आहे, असे ते म्हणाले.

“मेरिट ऑर्डर रेटिंग, हाय एनर्जी चार्ज रेट (ईसीआर), हाय ओक्झीलरी पॉवर कन्झमशन (एपीसी) आणि कोळशाचा वाढता वापर, या सारख्या घटकांमुळे पुढील काळ एनटीपीसीसाठी आव्हानात्मक आहे. तरीही, ईसीआर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” कमलेश सोनी यांनी सांगितले.

पश्चिम प्रादेशिक ऊर्जा समितीचे माजी सदस्य सचिव सत्यनारायण एस यांनी टीमवर्क आणि ज्ञानाची देवाणघेवाण याचे महत्व विषद केले. जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येऊन आपल्या  सामूहिक कौशल्याचा वापर करतात, तेव्हा ते नवोन्मेषाची संपूर्ण क्षमता संस्थेच्या लाभासाठी खुली करतात, असे ते म्हणाले.

प्रत्येक यशस्वी उपक्रमामागे लोकांची बांधिलकी असते, असे एचआर (पश्चिम-I) च्या प्रादेशिक प्रमुख वंदना चतुर्वेदी यांनी सांगितले.  

पश्चिम विभाग-I मधील सहा स्थानके/प्रकल्पातील 56 स्पर्धकांसह एकूण 16 संघ, या संमेलनात सहभागी झाले होते.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2097138) Visitor Counter : 30


Read this release in: English