ऊर्जा मंत्रालय
राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ, पश्चिम क्षेत्र-I मुख्यालयाकडून 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा
Posted On:
26 JAN 2025 1:09PM by PIB Mumbai
एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1 ने त्यांच्या मुंबईतल्या मुख्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला. एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1चे प्रादेशिक कार्यकारी संचालक कमलेश सोनी यांनी उपस्थित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना संबोधित केले. कंपनीची कामगिरी आणि या राष्ट्रीय दिवसाचे महत्त्व यावर विचार व्यक्त केले.
एनटीपीसीची कामगिरी आणि भविष्य योजना
सोनी यांनी, एनटीपीसीच्या प्रमुख कामगिरीविषयी बोलताना, कंपनीच्या वीज उत्पादनातल्या विक्रमी कामगिरीवर प्रकाश टाकला. आतापर्यंत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एनटीपीसीने 350 अब्ज युनिट्सपेक्षा अधिक वीज उत्पादित केली आहे. ज्यामध्ये प्लांट लोड फॅक्टर 90% पेक्षा अधिक आहे. त्यांनी, 2032 पर्यंत एनटीपीसीच्या 130 गिगावॉट वीज निर्मिती क्षमता गाठण्याच्या उद्दिष्टावरही तसेच त्याचबरोबर नवीकरणीय आणि अणुऊर्जा क्षेत्रांचा विस्तार करण्यासंबंधी चर्चा केली.
सोनी यांनी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान इथे एकंदर 58.36 कोटी गुंतवणुकीसह सुरू असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्रकल्पांवरही प्रकाश टाकला. हे प्रकल्प आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास आणि शाश्वतता यांच्यावर लक्ष केंद्रित करतात, ज्यातून एनटीपीसीची सामाजिक कल्याणासाठीची वचनबद्धता अधोरेखित केली जाते.
पुरस्कार आणि प्रशंसा
टॉप एम्प्लॉयर्स इन्स्टिट्यूटने एनटीपीसीला ‘सर्वोच्च नियोक्ता 2025’ म्हणून मान्यता दिली असल्याचे आणि फोबर्सच्या जागतिक 2000 यादीत 372 व्या क्रमांकावर आहे, असे सोनी यांनी अभिमानाने नमूद केले.
पश्चिम क्षेत्र 1 प्रकल्पातले महत्त्वाचे टप्पे
एनटीपीसीच्या पश्चिम क्षेत्र 1 मधील वीज प्रकल्पाच्या प्रभावी कामगिरीविषयी सोनी यांनी चर्चा केली ज्यामध्ये मौदा, सोलापूर आणि झानोर स्थानकांचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मौदा आणि सोलापूर स्थानकांनी प्रतिष्ठेचा ‘गोल्डन पॉवर पुरस्कार’ जिंकला आहे. तर झानोर आणि अँटा स्थानकांनी सुरक्षा आणि पर्यावरण पुरस्कार मिळवले आहेत.
सामाजिक पुढाकार आणि सामुदायिक सहभाग
कंपनीच्या सामाजिक उपक्रमांद्वारे, समुदायांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येतो. सोनी यांनी मीरा-भाईंदर परिसरातल्या 5000 पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कर्करोग तपासणी उपक्रम राबवल्याचा उल्लेख केला.
सुरक्षितता आणि शाश्वततेवर भर
सोनी यांनी एनटीपीसीच्या सुरक्षितते विषयीच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार करत घोषणा केली की, 100% राखेचा वापर, शून्य अपघात आणि किफायतशीर वीज उत्पादन करणे हा कंपनीचा उद्देश आहे. कंपनीच्या यशामध्ये योगदान देणाऱ्या या आव्हानात्मक उद्दिष्टांसाठी कार्यरत राहाण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.
सोनी यांनी, एनटीपीसीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाच्या कामगिरीचीही प्रशंसा केली, अलीकडे त्यांनी 14 व्या पीआरसीआय एक्सलन्स अवॉर्ड 2024 मध्ये पुरस्कार प्राप्त केला आहे. एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1मुख्यालयानेही 46 व्या अखिल भारतीय जनसंपर्क परिषदेत उत्कृष्ट कौशल्य विकास कार्यक्रमासाठी तिसरा पुरस्कार मिळवला.
एनटीपीसीच्या उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या सखी महिला समिती आणि संपर्क कल्याण मंडळ यांच्या सन्माननीय उल्लेखाने आणि राष्ट्रध्वज फडकावून तसेच देशभक्तीपर गीते सादर करून समारंभाचा समारोप झाला. सोनी यांनी एनटीपीसीची सातत्यपूर्ण राष्ट्रसेवा सुरू राहाण्यासाठी सचोटी, नाविन्य आणि उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध राहाण्याचे सर्वांना आवाहन केले.

***
S.Patil/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2096426)
Visitor Counter : 28