रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण


महाव्यवस्थापक मिश्रा यांनी या पवित्र प्रसंगी आपल्या सहकारी रेल्वे कर्मचाऱ्यांना  दिल्या शुभेच्छा

Posted On: 26 JAN 2025 1:32PM by PIB Mumbai

 

देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन पश्चिम रेल्वेने महालक्ष्मी स्पोर्ट्स ग्राउंड, मुंबई येथे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून साजरा केला. महाव्यवस्थापक मिश्रा  यांनी संचलन सोहळ्याचे निरीक्षण केले आणि मानवंदना स्वीकारली. मिश्रा यांनी उपस्थितांना संबोधित करताना  रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पश्चिम रेल्वेचे महानिरीक्षक आणि प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अजॉय सदनी यांनी महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांचे स्वागत  केले. पश्चिम रेल्वेच्या महिला कल्याण संघटनेच्या  अध्यक्ष क्षमा मिश्रा, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रकाश बुटानी, प्रधान  विभागप्रमुखांसह इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारीही उपस्थित होते.

आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या संदेशात, महाव्यवस्थापक मिश्रा यांनी उपस्थितांना पश्चिम रेल्वेने अलिकडच्या काळात मिळवलेले घवघवीत यश आणि गाठलेले महत्वपूर्ण टप्पे  यांची थोडक्यात माहिती दिली. महाव्यवस्थापक मिश्रा यांनी 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिष्ठित एफिशिअन्सी शिल्ड  प्राप्त केल्याबद्दल पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण चमूचे कौतुक केले. मिश्रा यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना कर्मचाऱ्यांना विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्या जोमाने आणि समर्पित वृत्तीने  अधिक मेहनत  करण्याचे आवाहन केले.

या शुभ प्रसंगी पश्चिम रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष क्षमा  मिश्रा  यांनी पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयाला  नवजात अतिदक्षता विभागात  नर्सिंग मातांच्या सोयीसाठी  अटेंडंट बेड कन्व्हर्टेबल चेअर, किचनसाठी ग्रेव्ही मशीन/पल्व्हरायझर आणि वॉटर प्युरिफायर तसेच वॉर्ड्ससाठी चहा/कॉफी फ्लास्क यासारख्या अनेक उपयुक्त वस्तू भेट म्हणून जगजीवन राम रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. ममता शर्मा यांच्याकडे सुपूर्द केल्या.   महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा आणि पश्चिम रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष क्षमा  मिश्रा  यांनी  जगजीवन राम  रुग्णालयाला भेट दिली. यावेळीरुग्णालयाच्या  नव्याने नूतनीकरण केलेल्या स्वागत कक्षाचे  उद्घाटन क्षमा मिश्रा यांच्या हस्ते आणि महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक , विभागप्रमुख आणि   रुग्णालयाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक कोंडा अनुराधा तसेच  इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  करण्यात आले.

कार्यक्रमानंतर आरपीएफचा डॉग स्क्वॉड शो तसेच अनेक देशभक्तीपर गाणी आणि नृत्य कलाविष्कारासह  सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2096413) Visitor Counter : 29


Read this release in: English