संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलन सोहोळ्यात  महाराष्ट्रातील विशेष पाहुणे सहभागी होणार

Posted On: 24 JAN 2025 3:53PM by PIB Mumbai

 

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि लष्करी सामर्थ्याचा एक अनोखा मिलाफ असेल, ज्यामध्ये संविधान लागू झाल्यापासूनच्या 75 वर्षांवर विशेष भर असेल. राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये 'लोकसहभाग' वाढवण्याच्या उद्देशाने, 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील विशेष पाहुण्यांचाही या निमंत्रितांमध्ये समावेश आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून आमंत्रित पाहुण्यांमध्ये यांचा समावेश आहे:

  • सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे जल योद्धे
  • प्राथमिक कृषी पत (पीएसी) संस्था
  • सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पाणी समित्या
  • सर्वोत्तम कामगिरी करणारे स्वयंसहायता गट सदस्य
  • पीएम यशस्वी योजनेचे लाभार्थी
  • वन आणि वन्यजीव संरक्षण स्वयंसेवक/कर्मचारी
  • हातमाग कारागीर
  • हस्तकला कारागीर
  • सरपंच
  • विशेष कामगिरी करणारे आणि आदिवासी योजनेचे लाभार्थी
  • मन की बात चे सहभागी
  • सर्वोत्तम स्टार्ट-अप्स
  • सर्वोत्तम पेटंट धारक
  • माय भारत स्वयंसेवक
  • पॅरालिम्पिक दल आणि आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा विजेते
  • पीएम सूर्य घर योजना लाभार्थी
  • अक्षय ऊर्जा कर्मचारी
  • पीएम कुसुम योजनेचे लाभार्थी
  • सर्वोत्तम कामगिरी करणारे पीएम-विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी
  • सर्वोत्तम कामगिरी करणारे पीएम मत्स्य संपदा योजनेचे लाभार्थी

काही आमंत्रित पाहुणे स्वयंसहायता गटांद्वारे (एसएचजी) उत्पन्न, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी उत्कृष्ट  कार्य करत आहेत. अन्न, पोषण, आरोग्य, पेयजल स्वच्छता, स्वच्छता, पंचायती राज संस्था-समुदाय आधारित संघटना, अभिसरण आणि स्त्री-पुरुष समानता उपक्रम या क्षेत्रात काम करणाऱ्या बचतगटांना आमंत्रित करण्यात आले आहे. यापूर्वी दिल्लीला भेट न दिलेल्या बचत गटातील सदस्याना  प्राधान्य देण्यात आले आहे.

पीएम सूर्य घर योजना आणि पीएम कुसुम अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि अक्षय ऊर्जेच्या वापराला बळ देणाऱ्या शेतकरी आणि कुटुंबांनाही पहिल्यांदाच आमंत्रित करण्यात आले आहे.

निवडक सरकारी उपक्रमांमध्ये उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या गावांच्या सरपंचांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने पंचायतींमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जाहीर केली होती. किमान सहा पथदर्शी योजनांमध्ये लक्ष्य गाठलेल्या पंचायतींची विशेष आमंत्रित म्हणून निवड करण्यात आली आहे.

निमंत्रितांपैकी अनेक जण प्रथमच दिल्लीला भेट देणार असून त्यांनी या विशेष प्रसंगी आपल्याला दिल्लीला निमंत्रित केल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.

प्रत्येक स्पर्धा माझा खेळ सुधारण्यासाठी मला उत्तम अनुभव देते.  मी माझ्या चुकांमधून शिकतो आणि प्रशिक्षणावेळी त्या त्रुटींवर काम करतो; ज्यामुळे पुढील स्पर्धेतील माझी कामगिरी उंचावते.  प्रजासत्ताक दिनाच्या परेडला निमंत्रित केल्याचा  मला अभिमान वाटतो.”असे, महाराष्ट्रातील पुणे येथील भारतीय दिव्यांग जलतरणपटू सुयश यादव म्हणाले.

पंतप्रधानांनी प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीला मला आमंत्रित केले आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे.हर घर बिजली या योजनेंतर्गत मी माझ्या घरी सौरऊर्जा पॅनेल बसवले आहेत.या योजनेचा मला लाभ  तर झालाच पण पर्यावरणाचे रक्षण  होऊन पृथ्वीवरील प्रदूषणही कमी झाले.  त्यामुळे भावी पिढ्यांना चांगला संदेश दिला जातो.”असे महाराष्ट्रातील नंदुरबार येथील पीएम  सूर्य घर योजनेचे लाभार्थी, मनोहर देवसिंग खर्डे  म्हणाले.

हे विशेष पाहुणे आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारे  आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे असून  ते स्वर्णिम भारताचे शिल्पकार आहेत.  प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यांव्यतिरिक्त, हे विशेष पाहुणे राष्ट्रीय युद्ध स्मारक, पीएम वस्तू  संग्रहालय आणि दिल्लीतील इतर प्रसिद्ध ठिकाणांना भेट देणार आहेत. त्यांची कामगिरी ज्या   मंत्रालयाअंतर्गत येते त्या मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी या पाहुण्यांना  मिळेल.  या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची संकल्पना ‘स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास’ अशी आहे.

***

N.Chitale/V.Joshi/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2095858) Visitor Counter : 42


Read this release in: English