माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पणजी इथे आयोजित नया भारत या विषयावरच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन
केंद्रीय संचार ब्युरोच्या गोवा विभागाच्या वतीने उभारलेल्या मिनी थिएटर अर्थात लघु प्रेक्षागृहाच्या स्वरुपातील दालनाने भेट देणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले
Posted On:
23 JAN 2025 8:29PM by PIB Mumbai
गोवा, 23 जानेवारी 2025
राज्यसभेचे सदस्य खासदार सदानंद तानावडे आणि गोवा सरकारचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते आज दि. 23 जानेवारी 2025. गोव्यात पणजी इथल्या कन्व्हेंशन सेंटर इथे 'नया भारत - ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' या विषयावरच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पणजी इथे सुरु असलेल्या तिसऱ्या Destination Goa @2025 या उपक्रमाअंतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

हे प्रदर्शन सदानंद तानावडे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आयोजित केले गेले आहे. या प्रदर्शनात केंद्र सरकारच्या अखत्यारितील अनेक संस्था आणि यंत्रणांची दालनेही उभारली आहेत. यात केंद्रीय संचार ब्युरो (CBC), भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI), सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड (CCL), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), सरकारी ई बाजारपेठ अर्थात गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या आणि अशा संस्थांचा समावेश आहे.
उद्घाटन सत्राला खासदार सदानंद तानावडे यांनी संबोधित केले. सरकारी विभागांकडून होत असलेली चांगली कामे लोकांसमोर आणणे हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून विविध विभागांच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याबाबत जनतेला माहिती व्हायला हवी. जनतेला अशा योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधींचा उपयोग करून घेता यावा, या उद्देशाने अशा सर्व योजनांबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे असाच सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे 2027 पर्यंत आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांना मोठा हातभार लागेल असे ते म्हणाले.
ALRF.jpeg)
रोहन खंवटे यांनी देखील यावेळी उपस्थिांना संबोधित केले. ज्याप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री स्वयंपूर्ण गोव्याबद्दल कायमच बोलत आले आहेत, तीच गोष्ट आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी महत्वाची आहे असे ते म्हणाले. त्या दृष्टीनेच केंद्र सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील युवा वर्गाने सरकारी क्षेत्रातील रोजगाराच्या संधींच्या पलीकडे पाहिले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. अशा प्रकारच्या प्रदर्शनांमुळे देशात काय चालले आहे आणि युवांसमोर कोणत्या संधी आहेत, हे समजून घ्यायला मदत होईल असेही ते म्हणाले.
येत्या 25 जानेवारी 2205 रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. तोपर्यंत सकाळी 11.00 ते संध्याकाळी 06:00 या वेळेत सर्वसामान्यांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे.
केंद्रीय संचार ब्युरोच्या गोवा विभागाच्या वतीने मिनी थिएटर अर्थात लघु प्रेक्षागृह
JK7V.jpeg)
पणजी कन्व्हेन्शन सेंटर इथल्या नया भारत' या विषयावरच्या प्रदर्शनाच्या आवारात केंद्रीय संचार ब्युरोच्या गोवा विभागाच्या वतीने उभारलेले मिनी थिएटर अर्थात लघु प्रेक्षागृहाच्या स्वरुपातील असून, ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या दालनात विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांशी संबंधित चित्रपट आणि चित्रफिती दाखवल्या जात आहेत. या दालनात टच स्क्रीनची सुविधा देखील उपलब्ध करून दिली असून, या स्क्रीनचा वापर करून नागरिकांपर्यंत शासकीय कार्यक्रमांची माहिती पोहचवली जात आहे.

यावेळी रोहन खंवटे, सदानंद तानावडे यांनी देखील केंद्रीय संचार ब्युरोच्या गोवा विभागाच्या वतीने उभारलेल्या दालनाला भेट दिली आणि, या दालनाला भेट द्यायला आलेल्या इतर नागरिकांशीही संवाद साधला. या दालनाच्या माध्यमातून केंद्रीय संचार ब्युरोच्या गोवा विभागाच्या वतीने शासकीय योजना आणि कार्यक्रमांबाबत लोक साक्षरता वाढवण्यासाठी पत्रके आणि माहिती पुस्तिकांचे वाटपही केले जात आहे.
* * *
PIB Panaji | S.Patil/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2095603)
Visitor Counter : 25