संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भर भारत : भारतीय सैन्यासाठी 47 T-72 ब्रिज लेईन्ग टँक खरेदी करण्यासाठी हेवी वेहिकल्स फॅक्टरी,एव्हीएनएल सोबत 1,561 कोटी रुपयांचा करार

Posted On: 21 JAN 2025 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025


संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी 47 टँक-72 ब्रिज लेइंग टँकच्या खरेदीसाठी आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या हेवी वेहिकल्स फॅक्टरीसोबत एकूण 1,560.52 कोटी रुपयांचा करार केला आहे. 21 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि एचव्हीएफ /एव्हीएनएल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षरी केली.

ब्रिज लेईन्ग टँक हे एक महत्वपूर्ण उपकरण आहे, जे यांत्रिक फोर्सद्वारे आक्रमण/बचावात्मक मोहिमांदरम्यान पूल बांधण्यासाठी वापरले जाते. हे टँक आणि आर्मर्ड व्हेईकल फ्लीटला पूल बनवण्याची क्षमता प्रदान करते, ज्यामुळे युद्धभूमीवर  गतिशीलता आणि आक्रमण क्षमता वाढते. या उपकरणाची खरेदी (भारतीय-स्वदेशी बनावटीची) असल्यामुळे संरक्षण क्षेत्रातील मेक-इन-इंडिया उपक्रमाला चालना मिळेल. एकूण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात आणि देशातील रोजगाराच्या संधी वाढवण्यातही हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2094898) Visitor Counter : 27


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil