माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय चित्रपटांचे राष्ट्रीय संग्रहालय  बालकांना  समर्पित  6 वा वर्धापन दिन  नेत्रदीपक पध्दतीने करणार साजरा

Posted On: 17 JAN 2025 2:27PM by PIB Mumbai

 

मुंबई, 19 जानेवारी, 2025

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) अंतर्गत असलेले भारतीय चित्रपट संग्रहालय (NMIC), 19 जानेवारी 2025 रोजी आपला 6 वा वर्धापन दिन विशेष पद्धतीने साजरा करणार असून हा दिवस बालकांसाठी समर्पित असेल. या  विशेष दिवशी संग्रहालय 13 आणि त्यापेक्षा कमी वयाच्या सर्व बालकांना विनामूल्य प्रवेश देणार आहे.  बालकांमधील सर्जनशीलता जागृत करण्यासाठी आणि त्यांच्यात सिनेमाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी हा दिवस उत्साहवर्धक उपक्रम, स्पर्धा आणि विविध चित्रपटांचे प्रसारण करत साजरा होणार आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक

  • 1:00 PM - 2:00 PM: संग्रहालय दर्शन

भारतीय सिनेमाची उत्क्रांती आणि टप्पे दाखवणाऱ्या भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या(NMIC)  उल्लेखनीय प्रवासाची सफर  

 • दुपारी 2:30 - दुपारी 3:30: आपल्या मनातले चित्र रंगवा

13 आणि त्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना आपल्या मनातील"चित्रपट संग्रहालय कसे असावे"(“पेंट युवर कॅनव्हास”)याविषयी त्यांच्या  कल्पना आणि त्यांचा दृष्टीकोन व्यक्त करण्यासाठी समर्पित एक सर्जनशील कला सत्र.

  • दुपारी 3:30PM  पुरस्कार सोहळा

पेंट युवर कॅनव्हास” या सत्राच्या विजेत्यांना हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आंचल मुंजाल यांच्या हस्ते गौरविण्यात येईल.

  • दुपारी 3:30 - 4:30 PM: एक विशेष सांगितिक कार्यक्रम आणि चित्रपट प्रदर्शन: कालिया मर्दन

डॉ. सुमीत पाटील यांच्या नेतृत्वाअंतर्गत  श्रीरंग धर्मादाय संस्था (चॅरिटेबल ट्रस्ट)यांच्या दृष्टिहीन कलाकारांच्या अनोख्या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन. कालिया मर्दन (1919) या सर्वसमावेशक कामगिरीने,सुरु झालेला  मूक चित्रपटांपासूनचा  चित्रपटांचा आकर्षक प्रवास

  • दुपारी 4:30 नंतर: चित्रपट स्क्रीनिंग: पप्पू की पगदंडी

तरुण प्रेक्षकांना गुंग करून टाकणाऱ्या पप्पू की पगदंडी या एका हृदयस्पर्शी चित्रपटाच्या प्रदर्शनाने या उत्सवाची सांगता होईल.

  चला,या सोहळ्यात सामील व्हा

भारतीय चित्रपट संग्रहालय (NMIC) मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्जनशीलता आणि चित्रपट विषयक अन्वेषण करण्याच्या या विशेष दिवशी सहभागी होण्यासाठी आमंत्रित करते.

अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी, कृपया संपर्क साधा:

ईमेल: nmicmumbai@nfdcindia.com

हा उत्सव भावी पिढ्यांच्या मनात  सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकतेची जोपासना करत भारतीय चित्रपटांचा वारसा जपण्याच्या,भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या (NMIC) वचनबद्धतेला अधोरेखित   करतो.

भारतीय चित्रपट संग्रहालयाबद्दल (NMIC)

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन,NFDC) अंतर्गत 2019 मध्ये स्थापन झालेले  भारतीय चित्रपटांचे राष्ट्रीय संग्रहालय हे सांस्कृतिक आणि चित्रपट इतिहासाचे केंद्र आहे.  संग्रहालय अभ्यागतांना त्यातील  समृद्ध कलाकृती, परस्परसंवादी प्रदर्शन आणि उत्कट अनुभव घेण्यासाठी  प्रेरित करत आहे.

  

Source NMIC

***

S.Patil/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2093897) Visitor Counter : 39


Read this release in: English