सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अली यावर जंग वाणी आणि श्रवण विकलांग राष्ट्रीय संस्थेने आयोजित केले निरोगी असहमतीला प्रोत्साहन आणि सक्षमीकरण करणारी कार्यस्थळे या विषयावरील सत्राचे आयोजन

Posted On: 15 JAN 2025 9:46PM by PIB Mumbai

मुंबई , 15 जानेवारी 2025
 

 

अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसेबिलिटी  (दिव्यांगजन) [एवायजेएनआयएसडी (डी)] अर्थात अली यावर जंग वाणी आणि श्रवण विकलांग राष्ट्रीय संस्थेने आज (15 जानेवारी 2025) 'कामाच्या ठिकाणी निरोगी असहमतीला प्रोत्साहन आणि संरक्षण' या विषयावर परिवर्तनकारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुंबई येथील एवायजेएनआयएसडी (डी) आणि अमेरिकन कॉन्सुलेट जनरल, मुंबई यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून, कामाच्या ठिकाणी समावेशक संवाद आणि रचनात्मक संघर्ष निराकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख लाभधारक एकत्र आले.

ख्यातनाम मध्यस्थ, प्रशिक्षक, संघर्ष हाताळणी प्रशिक्षक आणि संघटनात्मक सल्लागार मेरि हॅन्सन, यांनी या सत्राचे संचालन केले. अपंग (दिव्यांग) व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रांमधील श्रोत्यांना संबोधित करताना, संस्थात्मक रचना, गुंतागुंतीची परिस्थिती आणि व्यवस्थेत काम करताना इतरांपेक्षा आपले मत वेगळे असले, तरी ते व्यक्त करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. म्हणजेच, सर्वप्रथम इतरांचे मत जाणून घेण्याचे उद्दिष्ट ठेवून ऐकून घेण्यावर भर देत, कामाच्या ठिकाणी आदर देणे. असहमतीला कारणीभूत ठरणारी वैयक्तिक विचारधारा हाताळण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, कामाच्या ठिकाणी, अगदी अपंग (दिव्यांग) व्यक्तींसाठी देखील, असहमतीच्या वेळी येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, आवश्यक समावेशकता आणि व्यासपीठ उपलब्ध असणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. कामाच्या ठिकाणी सन्मानजनक वातावरणाची गरज हॅन्सन यांनी व्यक्त केली, जिथे महिला सुरक्षित राहतील आणि देशाच्या कायद्याचे पालन करून कामात भाग घेतील, ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक विकास होईल. मेरी हॅन्सन, या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मध्यस्थ, प्रशिक्षक, संघर्ष हाताळणी प्रशिक्षक आणि पेनिनसुला मेडीएशन एन्ड  एडीआर च्या संचालक आहेत.

अपंग (दिव्यांग) व्यक्तींसह सर्वांसाठी, निरोगी आणि सर्वसमावेशक कामाच्या जागा तयार करण्यासाठी, निरोगी असहमती स्वीकारण्याचे महत्त्व, या कार्यक्रमाने अधोरेखित केले. या उपक्रमाने सहभागींना, विशेषत: दिव्यांगजनांबरोबर काम करणाऱ्या संस्थांमध्ये, कामाच्या ठिकाणी संवाद वाढवण्यासाठी, संघर्षांचे सहानुभूतीपूर्वक निराकरण करण्यासाठी आणि आव्हानांना स्पष्टतेने सामोरे जाण्यासाठी साधने प्रदान केली.

या कार्यक्रमाने कामाच्या ठिकाणी निरोगी वातावरणाला चालना देण्यासाठी एवायजेएनआयएसडी ची असलेली वचनबद्धता प्रदर्शित केली. जिथे, अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करताना, मुक्त संवाद आणि रचनात्मक संघर्ष निराकरण हे समान हिताच्या मुद्द्यांवर एकमत मिळवण्याचे साधन आहे. एवायजेएनआयएसडी (डी) ही भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अपंग सक्षमीकरण विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे.

S.Patil/R Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2093250) Visitor Counter : 33


Read this release in: English