सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अॅन्ड हिअरिंग डीसॅबिलिटी (दिव्यांगजन) मुंबई येथे 'कामाच्या ठिकाणी फलदायी वादविवादाला प्रोत्साहन आणि संरक्षण"' या विषयावर होणार कार्यक्रम
Posted On:
14 JAN 2025 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025
शिक्षण विभागातर्फे, अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अॅन्ड हिअरिंग डीसॅबिलिटी (दिव्यांगजन)मुंबई आणि अमेरिकन वाणिज्य दूतावास, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “कामाच्या ठिकाणी फलदायी वादविवादांना प्रोत्साहन आणि संरक्षण” या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. हा कार्यक्रम उद्या, 15 जानेवारी 2025 रोजी बांद्रा (पश्चिम), मुंबई येथील परिसरामध्ये होईल.
दिव्यांग व्यक्ती काम करणाऱ्या क्षेत्रांमध्ये, संघर्षांवर सकारात्मक आणि ठोस दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.यामुळे संवाद सुधारण्यात,तसेच सहानुभूती आणि स्पष्टतेच्या आधारे वाद सोडवण्यातही मदत होईल. या कार्यक्रमासाठी सुमारे 60 सहभागींना आमंत्रित करण्यात आले आहे. यात अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अॅन्ड हिअरिंग डीसॅबिलिटी (दिव्यांगजन), मुंबई येथील प्राध्यापक, मुंबईतील विविध विशेष शाळांचे विशेष शिक्षक व मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. याशिवाय, बी.ए. आणि एम.ए. स्तरावर विशेष शिक्षण, ऑडिओलॉजी, आणि स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजीचा अभ्यास करणारे विद्यार्थीही या कार्यक्रमाचा भाग असतील.
अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अॅन्ड हिअरिंग डीसॅबिलिटी (दिव्यांगजन)अर्थात ए.वाय.जे.एन.आय.एस.एच.डी (डी), मुंबई, ही भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. सर्वसमावेशक आणि सशक्त वातावरण निर्माण करण्यासाठी ही संस्था वचनबद्ध आहे. म्हणजे मनुष्यबळ विकास, नैदानिक सेवा, संशोधन, पोहोच कार्यक्रम, जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2092934)
Visitor Counter : 24