संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू केला नवोन्मेष आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयावरील रिसेटलमेंट अभ्यासक्रम
Posted On:
09 JAN 2025 9:46PM by PIB Mumbai
मुंबई, 9 जानेवारी 2025
संरक्षण मंत्रालयाच्या रिसेटलमेंट झोनने (दक्षिण कमांड) अलीकडेच लष्कर, नौदल आणि हवाई दलातील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ) आणि निवृत्त अधिकाऱ्यांसाठी (आरओ) नवोन्मेष आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापनावरील रिसेटलमेंट अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले. 23 डिसेंबर 2024 ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणाऱ्या या अभ्यासक्रमाची सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना कृषी व्यवसाय आणि उद्योजकता क्षेत्रात विनाखंड संक्रमण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि अंतर्दृष्टी प्रदान करण्यासाठी रचना केली आहे. पुण्यामध्ये वाम्नीकॉम येथे या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला ब्रिगेडियर रोहित मेहता, एडीजी, डीआरझेड(सदर्न कमांड) आणि वाम्नीकॉमच्या संचालक हेमा यादव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. लष्करी सेवेदरम्यान विकसित केलेले नेतृत्व, शिस्त आणि धोरणात्मक विचार कौशल्ये वापरण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे या सहभागींना कृषी व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी करता येईल. हे क्षेत्र भारताच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहे. तज्ञांच्या नेतृत्वाखालील व्याख्याने, परस्परसंवादांचा समावेश असलेल्या कार्यशाळा आणि व्यावहारिक केस स्टडीजद्वारे, हा कार्यक्रम शेती-ते-बाजारपेठ पुरवठा साखळी, कृषी-तंत्रज्ञानातील नवोन्मेष, आर्थिक व्यवस्थापन आणि कृषी व्यवसाय उपक्रमांसाठी उद्योजकीय धोरणे यासारख्या आवश्यक विषयांना समाविष्ट करेल.
यावेळी बोलताना डॉ. हेमा यादव यांनी भारताच्या आर्थिक भवितव्यामध्ये नवोन्मेष आणि शाश्वत शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांमध्ये जे गुण असतात ते या क्षेत्रासाठी अतिशय आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिगेडियर रोहित मेहता, एडीजी, डीआरझेड यांनी संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी सक्षम करतानाच त्यांच्या पुनर्वसनाला पाठबळ देण्यामध्ये एक महत्त्वाचे पाऊल असलेला हा उपक्रम असल्याचे सांगत त्याची प्रशंसा केली. कार्यक्रम संचालक डॉ. महेश कदम यांनी स्वागतपर भाषण केले. तर डॉ. हेमा यादव यांनी बीजभाषण केले. ब्रिगेडियर रोहित मेहता यांनी विशेष संबोधन केले. तर डॉ. कदम यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
आपल्या देशाच्या रक्षकांना भारताच्या शाश्वत विकासात योगदान देत कृषी व्यवसायात प्रभावी कारकीर्द घडवून आणण्यासाठी सक्षम बनवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणारा हा कार्यक्रम आहे. रिसेटलमेंट महासंचालनालय, माजी सैनिक कल्याण विभाग(संरक्षण मंत्रालय) यांनी नामांकित केलेल्या या देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रमात लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे एकूण 46 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात वाम्नीकॉमने सरंक्षण दलाचे जेसीओ आणि लष्कराच्या इतर श्रेणीच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन तुकड्यांची व्यवस्था केली आहे. 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षात वाम्निकॉमने दोन तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
डीजीआर विषयी माहिती
डीजीआर अर्थात रिसेटलमेंट महासंचालनालय थेट माजी सैनिक कल्याण विभागाच्या(संरक्षण मंत्रालय) अंतर्गत थेट काम करणारी आंतर संरक्षण सेवा संघटना आहे. संरक्षण दलाचे युवा स्वरुप कायम राखण्यासाठी दरवर्षी सुमारे 60,000 संरक्षण कर्मचारी तुलनेने तरुण वयात निवृत्त/मुक्त होतात.निवृत्तीच्या वेळी संरक्षण दलातील अनेक कर्मचाऱ्यांच्या अंगावर अनेक अपूर्ण जबाबदाऱ्या असतात ज्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा रोजगार मिळवावा लागतो. अशा निवृत्त संरक्षण सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आणि सध्या उदयाला येत असलेल्या कॉर्पोरेट आणि उद्योग विश्वाच्या गरजांनुसार अतिरिक्त कौशल्ये प्रदान करण्याचे काम करतात. ज्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा करियर सुरू करता येते.
* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2091637)
Visitor Counter : 30