ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय मानक ब्युरोने आपल्या 78 व्या स्थापना दिनानिमित्त भारतीय मानक ब्युरो मानक कार्निव्हल केला आयोजित


देशात गुणवत्तापूर्ण संस्कृती विकसित करण्याच्या दृष्टीने या कार्निव्हलद्वारे विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे : भारतीय मानक ब्युरो

1300 हून अधिक विद्यार्थ्यांनी कार्निव्हलमध्ये घेतला सहभाग

Posted On: 08 JAN 2025 8:00PM by PIB Mumbai

मुंबई, 8 जानेवारी 2025

 

भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आपल्या 78 व्या स्थापना दिवसानिमित्त बीआयएस मानक कार्निवलचे आयोजन केले होते. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी गार्डन मधील बीआयएस सीईटीटीएम कॉम्प्लेक्स येथे आज, 08 जानेवारी 2025 रोजी आयोजित कार्यक्रमात 30 विविध शाळा आणि महाविद्यालयातील सुमारे 1300 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

"आजच्या कार्यक्रमाचे आयोजन विशेषत्वाने विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तेच्या मानकांविषयी माहिती पोहोचण्यासाठी करण्यात आले होते, जेणेकरून ही मुले मोठी होऊन त्यांच्या व्यावसायिक जीवनात प्रवेश करतील, तेव्हा ते मानकांचे महत्त्व समजून घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यास सक्षम होतील. परिणामी ते देशात दर्जेदार उत्पादने आणि सेवांचे उत्पादनही करतील." असे भारतीय मानक ब्युरोचे उपमहासंचालक संजय गोस्वामी यावेळी म्हणाले. या कार्निव्हलचे आयोजन विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी झाले आहे, असेही ते म्हणाले.

सायंटिस्ट-ई आणि मुंबई शाखा कार्यालय - 2 चे प्रमुख प्रेम सजनी यांनी नमूद केले की, "या कार्निव्हलद्वारे आम्ही आमच्या बीआयएस क्लबच्या विद्यार्थ्यांना हे माहित करून देऊ इच्छितो की कोणती उत्पादने बीआयएस प्रमाणित आहेत आणि एखाद्या उत्पादनांमध्ये गुणवत्तेचे कोणते मापदंड तपासले जातात."

सायंटिस्ट-बी आणि मुंबई शाखा कार्यालय - 1 चे प्रमुख पिनाकी गुप्ता यांनी सांगितले की, "आमचा उद्देश सर्वांमध्ये गुणवत्ता मानकांबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.

बीआयएस मानक कार्निव्हलने उद्योग आणि ग्राहक सुरक्षेच्या भविष्याला आकार देणाऱ्या प्रमुख विषयांचा मागोवा घेतला : मानकीकरणाचे भविष्य, गुणवत्तेसाठी अनुरूप मूल्यांकन, गुणवत्तेची मागणी निर्माण करणे आणि वर्धित मानकांसाठी डिजिटल पर्याय.  या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रगतीवर बीआयएस मानकांचा सखोल प्रभाव दाखवणारे विद्यार्थ्यांचे नवोन्मेषी प्रकल्प आणि उद्योग उत्पादनांचे सर्जनशील प्रदर्शन मांडण्यात आले.

या कार्निव्हलमध्ये आयएसआय-चिन्हांकित उत्पादनांवर प्रकाश टाकणारे समर्पित स्टॉलही होते. हे स्टॉल भारताची गुणवत्ता हमी परिसंस्था मजबूत करण्यात आणि ग्राहकांच्या विश्वासाला प्रोत्साहन देण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत होते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट उद्योगातील प्रमुख, नवोन्मेषक, विद्यार्थी आणि सरकारी प्रतिनिधींना चर्चेसाठी आणि भारताच्या वाढीतील मानकांच्या भूमिकेशी संबंधित मुख्य संकल्पना शोधण्यासाठी एकत्र आणणे हा आहे.

याव्यतिरिक्त, या कार्यक्रमाने नाविन्य आणि टिकाऊपणावर भर दिला, तसेच मानकीकरणात भारताचे जागतिक नेतृत्व, ग्राहक संरक्षण सुनिश्चित करणे, उद्योग पद्धतींमध्ये नवोन्मेष आणि टिकाऊपणा वाढविण्यात बीआयएस कशी मदत करत आहे याविषयी अंतर्दृष्टी प्रदान केली.  भारताच्या जागतिक नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेला चालना देण्यासाठी मानकीकरण आणि गुणवत्तेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर चर्चा करण्यासाठी या कार्निव्हलने एक अनोखे व्यासपीठ म्हणून काम केले.

भारतीय मानक ब्युरोबद्दल अधिक माहिती:

भारताची राष्ट्रीय मानक संस्था म्हणून, भारतीय मानक ब्युरो विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता, सुरक्षितता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2091268) Visitor Counter : 69


Read this release in: English