संरक्षण मंत्रालय
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांची 4 आणि 5 जानेवारी 2025 रोजी लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांना भेट
Posted On:
05 JAN 2025 4:52PM by PIB Mumbai
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी काल आणि आज ( 04 आणि 05 जानेवारी 2025) लक्षद्वीप बेटांना भेट दिली. हवाई दल प्रमुखांनी मिनिकॉय बेट आणि कवरत्ती बेटांवरील हवाई दलाच्या सैनिकांशी संवाद साधला. त्यांनी या भेटी दरम्यान विविध अन्य लष्करी आस्थापनांना भेटी दिल्या आणि भारतीय हवाई दल, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या सैनिकांशी संवाद साधला.
या संवादा दरम्यान हवाईदल प्रमुखांनी बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत आघाडीवर राहण्याच्या गरजेवर भर दिला. उदयोन्मुख संकटांवर उपाय शोधण्यात भारतीय वायुदलाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच त्यांनी सातत्याने उच्च दर्जाची सज्जता राखण्याच्या महत्त्वावरही यावेळी भर दिला.
हवाई दल प्रमुखांनी आघाडीवर तैनात सैनिकांच्या व्यावसायिक वृत्तीचे कौतुक केले आणि त्यांना राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सदैव सतर्क राहण्याचे आवाहन केले.
***
S.Kane/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2090352)
Visitor Counter : 42