कृषी मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी ‘डीएपी’खतावरील अतिरिक्त अनुदान देण्याच्या आणि ‘पीएम पीक विमा योजना’ सुरू ठेवण्यासाठी 69,515.71 कोटी रूपये मंजूर करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार
Posted On:
01 JAN 2025 10:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) वर अतिरिक्त अनुदान देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे कौतुक केले. मोदी सरकार शेतकऱ्यांचे संरक्षण कवच म्हणून उभे आहे आणि 2025 च्या पहिल्याच दिवशी सरकारने शेतकरी समुदायाला पाठिंबा देण्याच्या आपल्या अटल वचनबद्धतेची पुष्टी केली आहे, यावर त्यांनी भर दिला.
एक्स या समाज माध्यमावरील पोस्टवर मंत्री अमित शाह म्हणाले, “मोदी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी संरक्षक कवच म्हणून उभे आहे आणि 2025च्या पहिल्याच दिवशी शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्याचा संकल्प पुन्हा केला आहे. ‘डीएपी’ खतावर अतिरिक्त अतिरिक्त देण्याच्या निर्णयामुळे हे सुनिश्चित होते की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खताच्या किंमती वाढत असतानाही, आमच्या शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात डीएपी खत मिळत राहणार आहे. या विशेष पॅकेजसाठी पंतप्रधान मोदीजी यांचे आभार.”
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी दुसऱ्या ‘एक्स’ पोस्टमध्ये, 'पीएम पीक विमा योजने'च्या निरंतर अंमलबजावणीसाठी 69,515.71 कोटी रुपयांचा निधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला आणि नवोन्मेषी उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठी 824.77 कोटी रुपयांचा निधि मंजूर केला, त्याबद्दलही प्रशंसा केली.
मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, “मोदी मंत्रिमंडळाने आज 'पीएम पीक विमा योजने'ची अंमलबजावणी निरंतर सुरू रहावी यासाठी 69,515.71 कोटी रूपये मंजूर केले आहेत. यामुळे लाखो शेतकऱ्यांचे पीक नुकसानीपासून रक्षण होणार आहे, तसेच त्यांना मनःशांती मिळणार आहे. याव्यतिरिक्त, नवोन्मेषी उपक्रम आणि तंत्रज्ञानासाठी (एफआयएटी) निधीसाठी 824.77 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.”
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089446)
Visitor Counter : 45