नागरी उड्डाण मंत्रालय
विमान कंपन्यांना भेडसावणाऱ्या दृश्यमानतेचा प्रश्न सोडवण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून संबंधितांशी सल्लामसलत
Posted On:
01 JAN 2025 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025
थंडीच्या दिवसात विमानतळ परिसरामध्ये दाट धुके पसरल्यामुळे विमानांच्या उड्डाणाच्या वेळी आणि विमाने धावपट्टीवर उतरवताना आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते; विमान कंपन्यांना भेडसावणा-या दृश्यमानतेच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी आणि धुक्याच्या हंगामासाठी सज्जता सुनिश्चित करण्यासाठी, नागरी उड्डाण मंत्रालयाने गेल्या दोन महिन्यांपासून विमान कंपन्या, विमानतळ ऑपरेटर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (बीसीएएस), भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांच्याबरोबर अनेक स्तरावर सल्लामसलत केली. धुक्याशी संबंधित आव्हानांना सुरळीतपणे तोंड देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांसह प्रमुख भागधारकांमधील अखंड सहकार्याचे महत्त्व मंत्रालयाने अधोरेखित केले.
यासंदर्भामध्ये नागरी उड्डाण मंत्र्यांनी उड्डाण सुलभतेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला. या अनुषंगाने, या उपक्रमांचा उद्देश हवाई प्रवासाचा अनुभव सर्वांना चांगला यावा, तसेच विमानांना होणारा विलंब कमी करणे आणि प्रवाशांना अधिक पारदर्शक अधिक कार्यक्षम प्रवास अनुभव प्रदान करणे, हवामानातील व्यत्ययांमुळे प्रभावित होत असलेला प्रवासाचा वेळ कमी व्हावा, यासाठी पुढाकार घेतला जात आहे् या विशिष्ट उपक्रमांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- जे लोक हवाई प्रवास करत असतात, त्यांच्याबरोबर पारदर्शक संवाद सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. विमान कंपन्यांना दृश्यमानतेच्या समस्यांमुळे संभाव्य विलंब/ उड्डाण रद्द करण्याबाबत प्रवाशांशी सक्रियपणे संवाद साधण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी, तिकीट बुकिंग दरम्यान प्रवाशांची अचूक संपर्क माहिती नोंदवली गेली आहे, याची खात्री करण्याचे निर्देश एअरलाइन्स आणि बुकिंग एजंटना दिले.
- विमान कंपन्यांना 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, त्याला जोडूनच पुढे प्रवास केला जाणार असेल तर, आगामी उड्डाणे रद्द करण्याच्या पूर्वीच्या सूचनांची आठवण करून देण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.
- ‘डीजीसीए’ ने ऑनलाइन तिकीट एजंट्स (ओटीएंना) ने संवेदनशील असावे, प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांच्याकडे आारक्षण केलेल्या प्रवाशांशी उत्तम आणि स्पष्ट संवाद साधला गेला पाहिजे.
- मंत्रालयाने विमान कंपन्यांना त्यांच्या ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर्स (OCCs) आणि वॉर-रूम प्रतिनिधींना प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत, विशेषत: धुक्यादरम्यान जवळच्या समन्वयासाठी संवेदनशील राहण्याचा सल्ला दिला. या उपक्रमाचे उद्दिष्ट एअरलाईन कर्मचाऱ्यांना विमानतळावरील ऑपरेशन्सची नेमकी माहिती, वास्तविक परिस्थिती समजते याची खात्री करून ‘रिअल-टाइम’ निर्णय घेणे सुधारण्यात येणार आहे; ज्यामुळे फ्लाइट विलंब किंवा रद्द होण्याला अधिक प्रभावी आणि वेळेवर प्रतिसाद मिळू शकेल.
- ‘एएआय’ ने कार्यक्षम विस्तारित क्षे्त्र हवाई वाहतूक व्यवस्थापक मॅनेजमेंटसाठी नवीन मानक कार्यप्रणाली (एसआपी) लागू केल्या आहेत. या नवीन मानक कार्यप्रणालीमुळे धुक्याने प्रभावित विमानतळांवर आणि मूळ किंवा गंतव्य विमानतळावरील हवाई वाहतुकीचे प्रभावीपणे नियमन करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. एटीसी, एओसीसी, सीएटीएफएम आणि एअरलाइन ओसीसीमध्ये जवळचा आणि रिअल टाइम समन्वयाचा सल्ला सर्व भागधारकांना देण्यात आला आहे.
- सर्व हवामानविषयक उपकरणे व्यत्यय न आणता कार्य करत राहतील याची खात्री करण्यासाठी भारतीय हवामान विभाग वचनबद्ध आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या समन्वयाने, भारतीय हवामान विभाग दिल्ली विमानतळ आणि इतर धुके-प्रभावित विमानतळांवर प्रगत हवामान निरीक्षण प्रणाली (AWOS) ची अंमलबजावणी जलद करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहे. ही प्रणाली ऑपरेशनल सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रकांना अचूक आणि योग्य वेळेत हवामान माहिती मिळेल हे सुनिश्चित करते.
- उड्डाण रद्द झाल्यास प्रवाशांच्या पुन्हा सुरळीत पुन्हा प्रवेशासाठी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) परिपत्रक कार्यान्वित करण्यात आले आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) द्वारे भागधारकांसह कवायती आयोजित केल्या गेल्या. उड्डाणाला उशीर झालेल्या विमानात प्रवाशांना 90 मिनिटांपेक्षा जास्त वेळ रोखून धरले जाऊ नये हा या मागचा हेतू आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षणीयरीत्या कमी होईल आणि उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यावर सुरळीत री-बोर्डिंग प्रक्रिया सुनिश्चित होईल.
- नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने, एअरलाइन्सच्या समन्वयाने, प्रभावित विमानतळांवर धुक्याच्या कालावधीत कमी दृश्यमानतेत संपूर्ण कार्यक्षमतेने कार्ये पार पाडण्यासाठी CAT II/CAT III-अनुपालक क्रू आणि विमानांची पुरेशी संख्या तैनात करणे सुनिश्चित केले आहे. दिल्ली विमानतळावरील तीन धावपट्ट्यांवर CAT III ILS प्रणाली सक्रिय केली आहे, ज्यात महत्त्वाच्या धावपट्टी 10/28 चा समावेश आहे.
- दिल्ली विमानतळाने दृश्यमानतेच्या स्थीतीचे रिअल-टाइम अपडेट देण्यासाठी प्रमुख ठिकाणी एलईडी स्क्रीन स्थापित केल्या आहेत. दिल्ली विमानतळाने "फॉलो-मी" वाहनांची संख्या देखील वाढवली आहे, जे जमिनीवर कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत योग्य समन्वय सुनिश्चित करण्यासाठी वैमानिकांना ऍप्रन आणि टॅक्सीवेवर मार्गदर्शन आणि मदत करतील.
- प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी गर्दीच्या वेळेत चेक-इन काउंटरवर पूर्ण स्टाफिंग सुनिश्चित करण्यासाठी सर्व एअरलाईन्स वचनबद्ध आहेत. विमान उड्डाणाला विलंब किंवा उड्डाण रद्द करताना DGCA मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्याची भागधारकांना आठवण करून देण्यात आली, तसेच प्रवाशांना सर्वोच्च प्राधान्याने त्वरित माहिती दिली जाईल याची खात्री करून देण्यात आली.
- या नियमित सल्लामसलत आणि या प्रमुख उपक्रमांच्या अंमलबजावणीद्वारे, मंत्रालय हे सुनिश्चित करत आहे की धुक्याच्या हंगामातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व भागधारक अधिक सक्षम आणि सुसंघटित आहेत. प्रवाशांची सोय, सुरक्षितता आणि कोणत्याही त्रासाविना उड्डाणाचा अनुभव यावर आमचे प्राथमिक लक्ष केंद्रित आहे.
* * *
S.Patil/Suvarna/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089439)
Visitor Counter : 30