उपराष्ट्रपती कार्यालय
नवीन वर्ष 2025 च्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
31 DEC 2024 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
सर्व नागरिकांना वर्ष 2025 - आपल्या प्रजासत्ताकाच्या प्रवासातील एका ऐतिहासिक टप्प्याच्या आगमनासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष आपल्या संविधानाच्या शताब्दीच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रवेशाचे प्रतिक आहे - हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जो आपल्या लोकशाहीची संवैधानिक मूल्यांप्रती कायम असलेली वचनबद्धता आणि जागतिक आर्थिक केंद्र म्हणून उदय, याचा दाखला आहे.
चला, 2047 पर्यंत 'विकसित भारत' लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्या संविधान निर्मात्यांचा दृष्टीकोन साकार करण्यासाठी आपण स्वतःला पुन्हा समर्पित करूया.
या नवीन वर्षाची सुरुवात करताना, नागरी कर्तव्ये, आत्मनिर्भरता आणि सामाजिक समरसता या प्रतिज्ञा पुन्हा एकदा ग्रहण करत, भारताच्या अद्वितीय मूल्यांचे प्रतिबिंब असलेले शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी आपण वचनबद्ध होऊ या.
राष्ट्र प्रथम हे तत्व सर्वोच्च स्थानी ठेवत लोकशाही मूल्यांची जोपासना करत दृढ निर्धाराने पुढे जाऊया.
नव वर्ष सर्वांसाठी मंगलदायी आणि उद्देशपूर्ण राहो!
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089089)
Visitor Counter : 25