अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

एनपीसीआयएलकडून कॅप्टीव्ह वापरासाठी 220 मेगावॉट भारत स्मॉल रिऍक्टर्स (बीएसआर) उभारणीसाठी प्रस्ताव आमंत्रित


भारत स्मॉल रिऍक्टर्स (बीएसआर): डीकार्बनायझेशन आणि वाढीव जागतिक स्पर्धात्मकतेसाठी एक परिवर्तनकारक उपक्रम

Posted On: 31 DEC 2024 8:50PM by PIB Mumbai

मुंबई, 31 डिसेंबर 2024

 

भारतीय अणुऊर्जा महामंडळाने(NPCIL) कॅप्टीव्ह म्हणजे आस्थापना किंवा उद्योगांच्या स्वतःच्या वापरासाठी 220 मेगावॉटच्या भारत स्मॉल रिऍक्टर्स(बीएसआर) या लहान अणुभट्ट्या उभारण्यासाठी भारतीय उद्योगांकडून प्रस्ताव(आरएफपी) आमंत्रित केले आहेत. या सुटसुटीत प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिऍक्टर्सची रचना  अतिशय जास्त उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना अल्प कार्बन ऊर्जा पर्याय देण्याच्या दृष्टीने केली असून त्यामुळे त्यांना निष्कार्बनीकरणासाठी पावले उचलता येतील.

या आरएफपीचे तपशील पुढील यूआरएलवर उपलब्ध आहेत:

https://npcil.nic.in/writereaddata/CMS/202412300511513510127RFP_Document_31122024_01.pdf

भारत स्मॉल रिऍक्टर्स या अणुभट्ट्या अतिशय सुरक्षित आणि उत्तम कामगिरीसाठी ओळखल्या जातात, ज्यामुळे विश्वासार्ह आणि पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोतांच्या शोधात असलेल्या उद्योगांसाठी त्या एक आदर्श पर्याय आहेत. बीएसआर तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने उद्योगांना कार्बन उत्सर्जन संबंधित करांची लक्षणीय बचत करता येणार आहे ज्यामुळे त्यांची जागतिक बाजारातील स्पर्धात्मकता वाढू शकेल. 2024-25 च्या अर्थसंकल्पात अधोरेखित केल्यानुसार निष्कार्बनीकरणासाठी आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना अनुसरून हा उपक्रम आहे.

प्रत्येकी 220 मेगावॉट क्षमता असलेल्या या अणुभट्ट्यांची रचना, उद्योगांचे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करून स्वतःच्या ऊर्जाविषयक गरजा भागवण्यासाठी आणि एकंदर ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेषत्वाने करण्यात आली आहे. ही संयंत्रे खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीने उभारण्यात येणार आहेत, कायदेशीर चौकट आणि मान्यताप्राप्त व्यावसायिक मॉडेल अंतर्गत त्यांची रचना करण्यात येणार आहे.  

एनपीसीआयएल विषयी:

भारतीय अणुऊर्जा महामंडळ(एनपीसीआयएल) हा अणुऊर्जा विभागांतर्गत काम करणारा एक अतिशय प्रतिष्ठेचा सार्वजनिक उपक्रम असून भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांची रचना, उभारणी, परिचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी या उपक्रमाकडे आहे.  

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2089078) Visitor Counter : 58


Read this release in: English