कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यावर्षी देशभरात 614 लाख हेक्टरवर झाली रब्बी पिकांची पेरणी

Posted On: 30 DEC 2024 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024

 

यंदाच्या रब्बी हंगामात देशभरात 614 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा गव्हाच्या पेरणीअंतर्गतचे क्षेत्र 319.74लाख हेक्टरवर पोहचले आहे. गेल्या वर्षी याच हंगामात 313 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती. याशिवाय यंदाच्या रब्बी हंगामात 136.13 लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची  शेती  झाली असल्याची नोंद झाली आहे. तर 48.55 लाख हेक्टर क्षेत्रावर श्री अन्न,भरड धान्यांची पेरणी झाली असल्याचं कृषी मंत्रालयानं कळवलं आहे. यासोबतच यंदाच्या रब्बी हंगामात तेलबियांच्या पेरणीनं 96.15 लाख हेक्टरचा टप्पा ओलांडला असल्याची माहितीही कृषी मंत्रालयानं दिली आहे.

अनु. क्र.

पिके

सामान्य रब्बी क्षेत्र

पेरणी केलेले क्षेत्र

2024-25 (वर्तमान वर्ष)

2023-24 (मागील वर्ष)

1

गहू

312.35

319.74

313.00

2

भातपीक

42.02

14.37

13.61

3

डाळी

140.44

136.13

136.05

 

हरबरा

100.99

93.98

93.17

 

मसूर

15.13

17.43

17.76

 

वाटाणा

6.50

8.94

8.98

 

कुळीथ

1.98

3.13

3.42

 

उडीद

6.15

4.22

4.79

 

मूगडाळ

1.44

0.86

0.87

 

लकडा / तिवरा

2.79

3.12

3.32

 

इतर कडधान्ये

5.46

4.45

3.74

4

श्री अन्न आणि भरड धान्ये

53.46

48.55

47.77

 

ज्वारी

24.37

22.24

22.52

 

बाजरी

0.37

0.12

0.14

 

नाचणी

0.74

0.49

0.58

 

सूक्ष्म तृणधान्ये

0.15

0.15

0.00

 

मका

22.11

18.93

17.53

 

जव

5.72

6.62

7.01

5

तेलबिया

87.02

96.15

101.37

 

राई आणि मोहरी

79.16

88.50

93.73

 

भुईमूग

3.82

3.32

3.31

 

कुसुम

0.72

0.64

0.66

 

करडई / सूर्यफूल

0.81

0.59

0.33

 

तीळ

0.58

0.13

0.25

 

जवस

1.93

2.68

2.84

 

इतर तेलबिया

0.00

0.30

0.26

 

एकूण पिके

635.30

614.94

611.80

 

* * *

N.Chitale/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2088973) Visitor Counter : 40


Read this release in: English , Urdu , Hindi