राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) अध्यक्ष म्हणून रुजू
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2024 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2024
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांनी आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला, तसेच न्यायमूर्ती (डॉ.) विद्युत रंजन सारंगी यांनी आयोगाचे सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी त्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात, गेल्या आठवड्यात सदस्य म्हणून रुजू झालेले प्रियांक कनोन्गो यांचाही समावेश होता. त्यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 21 डिसेंबर 2024 रोजी केली. या प्रसंगी कार्यवाहक अध्यक्षा विजया भारती सयानी, महासचिव भरत लाल आणि आयोगातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना, न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांनी मानवी हक्कांचे मूल्य आणि त्यांचे पालन करण्याची भारतातील प्राचीन परंपरा अधोरेखित केली, ज्याची संकल्पना जागतिक स्तरावर ओळखली जाण्यापूर्वीपासून भारतात होती. तमिळ कवी थिरुवल्लुवर यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की मानवी हक्क भारतीय संस्कृतीच्या मुळांमध्ये खोलवर रुजलेले आहेत. मानवी हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी विविध भागधारकांच्या समन्वित प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

30 जून 1958 रोजी तामिळनाडूमधील मन्नारगुडी येथे जन्मलेले न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक प्रख्यात माजी न्यायाधीश आहेत.

प्रियांक कनोन्गो, मूळचे मध्य प्रदेशातील विदिशा येथील, मायक्रोबायोलॉजीमध्ये बी.एस्सी. पदवीधर असून भारतातील बाल हक्क आणि शिक्षणासाठी त्यांनी समर्पितपणे कार्य केले आहे. त्यांनी 2018 ते 2024 या कालावधीत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे (एनसीपीसीआर) अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आपल्या कार्यकाळात, कनोन्गो यांनी भारतीय समस्यांवर भारतीय उपाय शोधण्याचा आग्रह धरला, लहान मुलांच्या कल्याणासाठी विदेशी मॉडेल स्वीकारण्याऐवजी भारताच्या सांस्कृतिक संदर्भानुसार बाल कल्याण प्रणाली विकसित करण्याचे समर्थन केले.
20 जुलै 1962 रोजी ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यात जन्मलेले न्यायमूर्ती (डॉ.) विद्युत रंजन सारंगी हे भारतीय कायद्याच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात.

* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2088961)
आगंतुक पटल : 137