आयुष मंत्रालय
पॅराग्वेपासून ते जगातील इतर देशांपर्यंत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदाच्या वाढत्या जागतिक महत्वाची दिली माहिती
Posted On:
29 DEC 2024 4:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात" च्या 117 व्या भागात आयुर्वेदाच्या वाढत्या वैश्विक महत्वावर प्रकाश टाकला. पॅराग्वेमध्ये या संदर्भात होत असलेल्या प्रेरणादायक उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, “दक्षिण अमेरिकेत एक देश आहे, पॅराग्वे. तिथे राहणाऱ्या भारतीयांची संख्या एक हजारपेक्षा जास्त नसावी. पॅराग्वेमध्ये एक अद्भुत प्रयत्न केला जात आहे. पॅराग्वेतील भारतीय दूतावासात, एरिका ह्यूबर आयुर्वेद सल्ला देत आहेत. अनेक स्थानिक लोक त्यांच्याकडे आयुर्वेद-संबंधी सल्ला घेण्यासाठी येत आहेत.”



ही मान्यता आयुष मंत्रालयाच्या आयुर्वेदाला जागतिक आरोग्य आणि निरामयता प्रणाली म्हणून प्रोत्साहन देण्याच्या अतूट वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री. प्रतापराव जाधव यांनी म्हटले, “आयुर्वेदाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. आयुष मंत्रालय आयुर्वेदाला एक सार्वभौम आरोग्य उपाय म्हणून विकसित करण्यासाठी आणि त्याचे जागतिक महत्व वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.”
***
S.Kane/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2088759)