सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून घरगुती सामाजिक उपभोग : दूरसंवादविषयक आरोग्य आणि सर्वसमावेशक मॉड्युलर सर्वेक्षणविषयक राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Posted On: 23 DEC 2024 9:30PM by PIB Mumbai

मुंबई, 23 डिसेंबर 2024


केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून एक जानेवारी 2025 पासून घरगुती सामाजिक उपभोगः दूरसंवादविषयक आरोग्य आणि सर्वसमावेशक मॉड्युलर सर्वेक्षणविषयक राष्ट्रीय नमुना  सर्वेक्षणाची 80 वी फेरी देशभरात सुरू केली जाणार आहे. या अनुषंगाने सांख्यिकी कार्यालयाच्या मुंबईच्या फील्ड ऑपरेशन विभागाने महाराष्ट्र पश्चिम क्षेत्रासाठी नवी मुंबईत आजपासून चार दिवसाच्या प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे(RTC) आयोजन केले. एनएसओ आणि अर्थशास्त्र आणि सांख्यिकी राज्य महासंचालनालयाकडून एक जानेवारी 2025 पासून एक वर्षासाठी आरोग्यविषयक सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे. तर सीएमस-टी हे सर्वेक्षण जानेवारी-मार्च, 2025 दरम्यान राबवण्यात येणार आहे.

सुप्रिया रॉय, उपमहासंचालक प्रादेशिक कार्यालय, एनएसओ, मुंबई यांनी या प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे समारंभपूर्वक दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. डॉ. सचिन गायकवाड, मुख्य वैद्यकीय अधिकारी, सीजीएचएस,  आनंद एस लाढे, वैज्ञानिक-एफ, एनआयसी, आर.पी. थोटे, जे.टी. संचालक आणि  एस. सी. लाड, उपसंचालक, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र,  के. राजगोपाल, सहाय्यक संचालक, एनएसओ (एफओडी), प्रादेशिक कार्यालय मुंबई आणि एच. व्ही. राभाडिया, सहाय्यक संचालक, एनएसओ (एफओडी), उप प्रादेशिक कार्यालय, ठाणे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.आपल्या संबोधनात सुप्रिया रॉय यांनी सांगितले, “ आरोग्य क्षेत्र आणि व्याधी यांच्याशी संबधित माहिती गोळा करणे हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे.” सचिन गायकवाड, मुख्य वैद्यकीय अधिकारी, सीजीएचएस यांनी देशाच्या एकंदर विकासासाठी आरोग्य सर्वेक्षणाच्या महत्त्वावर भर दिला.दूरसंवाद संबंधित निदेशक  आणि आयसीटी कौशल्यविषयक माहितीमुळे सरकारला महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होईल, असे आनंद लाढे, वैज्ञानिक- एफ- एनआयसी यांनी अधोरेखित केले. सार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही संस्थामध्ये आरोग्य सेवांच्या वापराच्या व्याप्तीशी संबंधित माहिती, नियोजनबाह्य खर्च तसेच सरकारी अर्थसाहाय्य मिळणाऱ्या उपचारांसाठी आरोग्य विमा योजना, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण याविषयी माहिती उपलब्ध करून देण्याचे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. दूरसंवादावर सर्वसमावेशक मॉड्युलर सर्वेक्षणामुळे दूरसंवाद संबंधित इंडिकेटर्स आणि आयसीटी कौशल्ये याविषयी माहिती उपलब्ध होईल. संकलित केलेल्या डेटाचा वापर मंत्रालये/विभाग यांच्याकडून जागतिक निर्देशांकाची माहिती देण्यासाठी देखील केला जाईल. हे सर्वेक्षण यशस्वी होण्यासाठी मुलाखतकर्त्याने विचारलेल्या प्रश्नांची सर्वसामान्य नागरिकांनी अतिशय शांतपणे उत्तरे देऊन सहकार्य करणे अतिशय गरजेचे आहे.

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2087459) Visitor Counter : 109


Read this release in: English